Tamanna Bhatia : प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला (Tamanna Bhatia) कर्नाटक सरकारने मैसूर साबणाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त (Karnataka News) केले आहे. यासाठी अभिनेत्रीबरोबर 6.2 कोटी रुपयांचा करार सरकारने केला आहे. हा करार दोन वर्षांसाठी आहे. परंतु, या करारावर आता लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. रश्मिका मंदाना, दिपिका पादुकोण, पूजा हेगडे आणि कियारा अडवाणी यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्री असताना तमन्नालाच का निवडण्यात आलं असा लोकांचा सवाल आहे. या प्रश्नाचं उत्तर मंत्री एमबी पाटील यांनी दिलं आहे.
एएनआयनुसार एमबी पाटील म्हणाले, मी असा एक माणूस आहे ज्याच्या मनात कन्नड भाषेबद्दल अपार सम्मान आहे. हा एक बिजनेस ट्रेड आहे. याला संपूर्ण भारत आणि विदेशातही प्रमोट करायला हवे. तमन्नालाच या करारासाठी घेण्यात आलं याचं महत्वाचं कारण म्हणजे तमन्नाचे इंस्टाग्रामवर 2.8 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या करारासाठी तमन्नाच योग्य आहे.
गेम चेंजरमधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, कियारा अडवाणी अन् राम चरणचा जबरदस्त जलवा
रश्मिका मंदानाने दुसरा प्रोजेक्ट करारबद्ध केला आहे. कियारा आणि पूजा हेगडे यांनाही करारबद्ध करणे कठीण होते. तर दीपिका पदुकोण कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडच्या बजेटमध्येच बसत नव्हती. तमन्नाला करारबद्ध करण्याआधी या अभिनेत्रींच्या नावावर विचार झाला होता. परंतु, त्यांचे सध्याचे प्रोजेक्ट, त्यांची उपस्थिती आणि त्यांच्याकडून आकारली जाणारी फी या गोष्टी लक्षात घेता तमन्नाच या करारासाठी योग्य होती असेही पाटील यांनी सांगितले.
तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात रिलीज झालेल्या अजय देवगणच्या ‘रेड 2’ चित्रपटात तमन्ना दिसली. या चित्रपटातील नशा या गाण्यात ती दिसली होती. मागील वर्षात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री 2’ चित्रपटातील गाण्यातही तमन्नाने परफॉर्म केला होता. मैसूर सँडल सोप ब्रँड खूप जुना ब्रँड आहे. हा साबण 1916 पासून तयार केला जात आहे. या साबणाचे उत्पादन कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड करते.
‘देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या प्रेमाने भारावलोच…’ वॉर 2 च्या टीझरवर NTR ची प्रतिक्रिया