‘देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या प्रेमाने भारावलोच…’ वॉर 2 च्या टीझरवर NTR ची प्रतिक्रिया

NTR’s Reaction On War 2 Teaser : सगळ्या भारतात लोकप्रिय असलेला पॅन इंडिया सुपरस्टार एनटीआर (NTR) जो ‘मॅन ऑफ द मासेस’ म्हणून ओळखला जातो. त्याने वॉर 2 च्या टीझरमधून पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, तो खऱ्या अर्थाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला अभिनेता आहे. जसा टीझर (War 2) प्रदर्शित झाला, तसंच एनटीआरच्या जबरदस्त स्पाय अॅक्शनने सोशल मीडियावर एकच वर्चस्व निर्माण (Entertainment News) केलं. चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाने एनटीआर भावनिक झाला आहे.
बांग्लादेश, अफगाणिस्तान, धरण अन् फायटर जेट; भारताच्या कोंडीसाठी चीनचे 4 मोठे डाव..
एनटीआर म्हणतो की, अभिनेता म्हणून काम करताना जेव्हा प्रेक्षकांकडून निःस्वार्थ प्रेम मिळतं, तेव्हा त्यासारखं दुसरं काही नाही. ही भावना फारच दुर्मिळ आणि अमूल्य आहे. वॉर 2 साठी देशभरातून जसं प्रेम मिळत आहे, त्याने मी भारावून गेलो आहे. हा चित्रपट मला एका वेगळ्याच रूपात सादर करतो. हे पात्र साकारताना मला खूप मजा आली, असं देखील एनटीआरने म्हटलं आहे.
एनटीआर सांगतो की, त्याने या भूमिकेसाठी आपली पूर्ण ऊर्जा आणि भावना ओतली. तीच ऊर्जा प्रेक्षकांनी ओळखली याचं त्यांना समाधान आहे. हे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भूमिकेत मन, शरीर आणि आत्मा टाकता, तेव्हा अशा प्रकारचं प्रेक्षकांचं प्रेम खूप मोठं समाधान देतं, असं देखील एनटीआरने म्हटलंय.
हगवणे कुटुंबीय मोठ्या मुलालाही मारहाण करायचे; मोठ्या सुनबाईंनी केला धक्कादायक उलगडा
एनटीआर पुढे म्हणतो, वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सने नेहमीच सिनेमा आणि बॉक्स ऑफिसचे नवीन ट्रेंड सेट केले आहेत. या चित्रपटाच्या मोहिमेची सुरुवातच इतकी भव्य झाली, हे पाहून खूप आनंद होतो आहे. आता 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये हे वेड पाहण्याची प्रतीक्षा आहे. आदित्य चोप्रा निर्मित आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कियारा अडवाणीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.