हगवणे कुटुंबीय मोठ्या मुलालाही मारहाण करायचे; मोठ्या सुनबाईंनी केला धक्कादायक उलगडा

Vashnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vashnavi Hagawane Case) आता अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. हगवणे कुटुंबियाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे यांनीदेखील हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले असून संपूर्ण पोलखोलच केली आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नणंद आणि दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला असल्याचा दावा मयुरी जगताप हगवणे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणा आणखी ट्विस्ट आला असल्याचं बोललं जात आहे.
पुढे बोलताना मयुरी हगवणे म्हणाल्या, माझं लग्न 2022 सुशिल यांच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर सासूने लाड केले तर नणंद त्रास द्यायची. माझी नणंद आणि सासू नेहमीच मला शारीरीक आणि मानसिक त्रास देत असत. या संपूर्ण घडामोडींंमध्ये माझा नवरा माझी साथ देत होता. मला त्यांनी पाठिंबाही दिला होता. माझा नवरा मला साथ देत असल्याने हगवणे यांच्या कुटुंबियांनी माझ्या नवऱ्यालाही अनेकदा मारहाण केल्याचा आरोप मयुरी यांनी केला आहे.
एका दिवसात किती प्रमाणात गोड पदार्थ खावेत? शरीराला किती साखरेची गरज? जाणून घ्या…
तसेच मागील दीड वर्षांपासून आम्ही आता वेगळं राहत आहोत. नंदेने आणि दीराने माझ्यावर चारित्रावर संशय घेतलेला आहे, सासऱ्यांनीही माझ्यावर हात टाकलेला आहे. मानसिक शारीरीक त्रास सासू नणंद द्यायचे, त्यामुळे आम्ही घर सोडलं आणि वेगळं राहिलो. नोव्हेंबरला आम्ही घरं सोडलं तेव्हा मला मारहाण झाल्याची तक्रार मी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. पोलिसांनी समजून सांगण्याची भूमिका घेतली, पोलिसांनी आमच्यावर दबाव आणल्याचाही आरोप मयुरी यांनी केलायं.
Video : ‘…असं फक्त पवारांचा पठ्ठ्याचं करू शकतो’; पुणे जलमय होताच रस्त्यावर केलं अनोखं आंदोलन
उशिराने आमची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनंतर नंदेने भाऊ आणि आईविरोधात तक्रार दिली की तिच्याच आईने भावाने तिला मारलंय, असंही मयुरी यांनी सांगितलंय. आज वैष्णवीने आमच्यासारखा निर्णय घेतला असता तर ती जिवंत असते, माझ्यासोबत तिला बोलू देत नव्हते. माझा नवरा म्हणायचा तिला एवढा त्रास देऊ नका तर माझ्या नवऱ्यालाच म्हणायचे की ती सोन्याचा घास घरात खाते, असं मयुरी हगवणे यांनी स्पष्ट केलंय.
अखेर बाळ कस्पटे कुटुंबियाकडे सोपवलं…
वैष्णवी हगवणेच्या मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झालंय. मात्र आईच्या मृत्युंनंतर ते बाळ कुठे गायब केल्याचा दावा केला जात होता. याबाबत वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक माहिती दिली होती. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. अखेर पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतलंय. बाळ कस्पटेंकडे सोपवा, अशा स्पष्ट सूचना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांना केल्या होत्या. त्यानंतर बाळ ताब्यात घेऊन कस्पटे कुटुंबाकडे सोपविण्यात आलंय.