Download App

ब्रेथ ॲनालायझर मद्य सेवनाचा निर्णायक पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Breathe Analyzer हा मद्य सेवनाचा ठोस पुरावा असु शकत नाही. असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पटणा उच्च न्यायालयाने दिला आहे

Breathe Analyzer not conclusive proof of liquor consumption : ब्रेथ ॲनालायझर (Breathe Analyzer) अहवाल हा एखाद्या व्यक्तीने मद्य सेवन केलं आहे किंवा नाही. या गोष्टीचा ठोस पुरावा असु शकत नाही. असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पटणा उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. बिहारमधील किशनपूर येथील एका उपविभागीय कार्यालयातील लिपिकाच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवला आहे. दरम्यान रस्ते अपघात किंवा ट्राफिक पोलिसांकडून वाहनचालकांच्या मद्य सेवनाच्या तपासणीसाठी सर्रास ब्रेथ ॲनालायझर म्हणजेच व्यक्तीच्या श्वासांवरून मद्य सेवनाची तपासणी करणारे डिव्हाईस वापरले जाते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बिहार मधील किशनपुर येथील एका उपविभागीय कार्यालयातील लिपिकावर मद्य सेवन करून काम करत असल्याच्या गुन्ह्याखाली 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2020 मध्ये या लिपीकाला सेवेतून बडतर्फ देखील करण्यात आले होते. त्यावर या लिपिकाच्या पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मोठी बातमी! फटाका कारखान्यात एकामागे एक भीषण स्फोट; वटपौर्णिमेमुळे अनर्थ टळला

दरम्यान याचिकेवर निर्णय येण्याअगोदरच लिपिकाचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र त्याची बाजू मांडताना वकिलांनी न्यायालयात सांगितले की, या लिपिकाने सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल असलेलं कफ सिरप सेवन केलं होतं. त्यामुळे जेव्हा त्याला अटक केली तेव्हा त्याची तपासणी ब्रेथ अनालायझरद्वारे करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी मद्य सेवन केलं असल्याचा समोर आलं. मात्र मद्य सेवनाची खात्री करण्यासाठी त्याचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले नाहीत. त्यामुळे त्याने मद्य सेवन करून काम केले असल्याचे म्हणणे चुकीचे आहेत. त्याच्यावरील आरोप चुकीचे असल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलं आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

तर न्यायाधिशांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद एकून घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणामध्ये एक निष्कर्ष नोंदवला की, ब्रेथ ॲनालायझर अहवाल हा एखाद्या व्यक्तीने मद्य सेवन केलं आहे किंवा नाही. या गोष्टीचा ठोस पुरावा असु शकत नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीने मद्य सेवन केल्याची तपासणी करण्यासाठी रक्त आणि लघवीचे नमुने घेणे त्यातून आलेले समोर आलेले निष्कर्ष हे ठोस पुरावा असू शकतो. त्याचबरोबर या प्रकरणांमध्ये संबंधित लिपिक अस्थिर चालत होता किंवा विसंगत बोलत होता असा कोणताही आरोप त्याच्यावर नाही. असं देखील न्यायाधीशांनी नमूद केलं. न्यायमूर्ती विवेक चौधरी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.

‘अग्निवीर’, ‘नीट’ अन् ‘नेट’..विरोधकांच्या हाती मुद्दे खटाखट; संसदेत ‘एनडीए’ होणार घामाघूम?

दरम्यान रस्ते अपघाताची प्रकरणं असो किंवा ट्राफिक पोलिसांकडून वाहनचालकांची केली जाणारी तपासणी असो. यामध्ये चालकाने किंवा मद्य सेवन केले आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी सर्रास ब्रेथ ॲनालायझर म्हणजेच व्यक्तीच्या श्वासांवरून मद्य सेवनाची तपासणी करणारे डिव्हाईस वापरले जाते. मात्र अशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीने काही प्रमाणात अल्कोहोल असलेले औषधं घेतलेले असतील तर त्याची तपासणी देखील सकारात्मक येऊ शकते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीने मद्य सेवन केले नसेल तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पटणा उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल महत्त्वपुर्ण आहे.

 

follow us

वेब स्टोरीज