Download App

G20 परिषदेत ऋषी सुनकांकडं भारताचं दुर्लक्ष; ब्रिटीश मीडियाने केला दावा

नवी दिल्लीत पार पडलेल्या G20 परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडं भारताने दुर्लक्ष केल्याचा दावा ब्रिटनच्या एका वृत्तपत्राने केला आहे. या लेखाला ‘ऋषी कोण…?’ असं शीर्षक देण्यात आलं असून भारताच्या जावयाला भारताता म्हणावी तशी किंमत मिळाली नसल्याचं लेखात म्हटलं आहे.

नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग

भारतात आयोजित केलेल्या G20 परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत स्वत:च्या घरात बैठक घेतली असल्याचंही म्हटलं आहे. ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांना भारतात अपेक्षेपेक्षा अधिक पाहुणचार केला नाही. ऋषी सुनक यांना दिल्लीत सर्व सुविधा बंद असल्यानेच अडचणीत असल्याचाही उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.

AR Rahman यांच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; चाहत्यांनी व्यवस्थापकाच्या नावाने ओढले ताशेरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुनक यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी बैठक एक दिवस आधी होणार होती. पण ऋषी सुनक यांचा पसंतीक्रम डावलण्यात आला असून ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी राखून ठेवण्यात आली होती. अखेर सुनक यांनी G20 परिषदेच्या ठिकाणीच कॉन्फरन्स रूममध्ये भारतीय पंतप्रधानांची भेट घेतली.

सुनक यांना त्यांच्या पत्नी अक्षता यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचे नियोजन होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाने दिल्ली शहर पूर्णपणे बंद होते. त्यामुळे सुनक यांना पत्नीसह दुसऱ्याच हॉटेलमध्ये जेवण करावं लागलं असल्याचाही उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे दिल्लीत दाखल झाले होते. याशिवाय, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-यो, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, दक्षिण कोरियाचे पंतप्रधान डॉ. सिरिल रामाफोसा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगान, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीझ हे मान्यवर नेत्यांनीही दिल्लीत हजेरी लावली होती.

Tags

follow us