Download App

मोठी बातमी! BSF जवानाने बॉर्डर ओलांडली; पाकिस्तानी रेंजर्सने घेतलं ताब्यात…

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटत असतानाच आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या जवानाने पाकिस्तानची बॉर्डर ओलांडली.

BSF Jawaan Crosses Pakistani Border : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. असं असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या जवानाने बॉर्डर ओलांडली. या जवानाने बॉर्डर ओलांडून पाकिस्तानच्या (BSF Jawaan Crosses Pakistani Border) हद्दीत गेल्याने पाकिस्तान सैन्यांनी जवानाला ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. पाकिस्तानस्थित फिरोजपूर सीमारेषेवर ही घटना झाली.

‘दहशतवाद्यांना’ पोसण्यासाठी पाकिस्तान किती खर्च करतो? आकडे वाचून पायाखालची जमीन सरकेल

भारत-पाक सीमेवरील फिरोजपूरमधील झिरो लाईन पार करुन हा बीएसएफचा जवान पाकिस्तान हद्दीत गेला. या जवानाला पाकच्या सैन्याने ताब्यात घेतलं असून जवान सीमारेषेवरील कुंपणाच्या हद्दीत नो मॅन्स लॅंडवरील पीकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या निगराणीचे काम करीत होता. चुकीने पाकिस्तानी हद्दीत गेल्याने आता त्याला परत आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बैठका घेतल्या जात आहेत.

भारत पाकिस्तानचे पाणी तोडू शकतो का?; किती ताकद अन् अधिकार.. जाणून घ्या, पाणीवाटपाचा इतिहास

झिरो लाईनच्या अगोदर या भागातील शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करण्यात परवानगी देण्यात येते. त्यामुळे पीकांची पेरणी करताना जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. इथल्या शेतकऱ्यांना किसान कार्डही दिलं जातं.

पहलगाम दहशतवादी हल्ला, एकाच दिवसात तब्बल 70% टूर रद्द; अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन जवान उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी एका झाडाखाली बसण्यास गेला होता. पण ही जागा पाकिस्तान हद्दीत येत असल्याने पाकिस्तानी रेंजर्स चेक पोस्टवर पोहोचले आणि जवानाला ताब्यात घेतलं. या जवानाकडील शस्त्रेदेखील जप्त करण्यात आली आहेत.

follow us