‘दहशतवाद्यांना’ पोसण्यासाठी पाकिस्तान किती खर्च करतो? आकडे वाचून पायाखालची जमीन सरकेल

How Much Pakistan Spend On Terrorist : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटलंय की, ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलंय, ज्यांनी यासाठी कट रचलाय. त्यांना भयंकर शिक्षा दिली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी (Terrorist) संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (Pakistan) घेतली आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख पाकिस्तानात (Pahalgam Terror Attack) राहतो, त्यामुळे या हल्ल्यामागील कटही पाकिस्तानशी जोडला गेलाय. पाकिस्तान दरवर्षी या दहशतवाद्यांना पोसण्यासाठी किती पैसे खर्च करतो, ते आपण सविस्तर पाहू या.
दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानचा खर्च
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या जम्मू आणि काश्मीर रिसर्च जर्नलमधील टेररिस्ट फायनान्स अँड सपोर्ट स्ट्रक्चरमध्ये, संशोधन अभ्यासक एनएस जामवाल यांनी भारतात दहशतवाद टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तान दरवर्षी किती पैसे खर्च करतो, हे सांगितले आहे. या जर्नलनुसार पाकिस्तान सीमेपलीकडून भारतात दहशत निर्माण करण्यासाठी दरवर्षी सुमारे 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 42 कोटी रुपये) खर्च करतो. त्याच वेळी भारत सरकार हे दहशतवादी हल्ले संपवण्यासाठी दरवर्षी 730 कोटी रुपये खर्च करते.
एनएस जामवाल यांनी त्यांच्या संशोधन जर्नलमध्ये म्हटलंय की, पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांवर दरवर्षी सुमारे 79 ते 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (म्हणजे 683 कोटी रुपये) खर्च करतो. हा खर्च दहशतवाद्यांची भरती करणे, हल्ले करणे आणि दहशतवाद्यांना पगार देणे यावर खर्च केला जातो.
“पाकिस्तानने हत्यारे लोड केली अन्..” भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान भेदरला
दरमहा दहशतवाद्यांना पगार
काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तान देशी आणि परदेशी दहशतवाद्यांचा वापर करतो. परदेशी दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी पाकिस्तान 50,000 रुपये देतो. तर लोकर काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना 25,000 रुपये देतो. यासोबतच पाकिस्तान दरमहा दहशतवाद्यांना पगार देखील देतो, यामध्ये परदेशी दहशतवाद्यांना 10 ते 12 हजार रुपये आणि स्थानिक दहशतवाद्यांना 8 ते 10 हजार रुपये पगार दिला जातो.
भारताची कारवाई अन् पाकिस्तानी शेअर बाजारात हाहाकार; गुंतवणूकदारांना मोठा फटका
पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही नेते आहेत, ज्यांना पाकिस्तान स्थानिक आणि परदेशी नेत्यांना मासिक 50,000 रुपये पगार देतो. जेव्हा जेव्हा या दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी पाठवले जाते तेव्हा त्यांच्या गटाला 1 ते 2 लाख रुपयांचा निधी दिला जातो. त्याचबरोबर दहशतवाद्यांनी वर्षभरात केलेल्या गुन्ह्यांवर आधारित दरवर्षी 2 ते अडीच लाख रुपयांचे बक्षीस देखील दिले जाते.
प्रशिक्षणावर खर्च
पाकिस्तानने भरती केलेल्या दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एका दहशतवाद्याला प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च येतो. याशिवाय दहशतवाद्यांना दिलेल्या ड्रेस आणि उपकरणांवर 25 ते 30 हजार रुपये खर्च केले जातात.
दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदत
चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान आर्थिक मदत करतो. या अंतर्गत पाकिस्तान मारल्या गेलेल्या परदेशी दहशतवाद्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांपर्यंतची मदत देतो. काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी मारला गेला की, त्याच्या कुटुंबाला दरमहा 20,000 रुपये आणि 2000 ते 3000 रुपये भरपाई म्हणून दिले जातात.