Download App

कोसी प्रकल्प, आयआयटीचा विस्तार, विमानतळ; नितीशबाबूंना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

Budget 2025 Big Benifit For Bihar: पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यामुळे बिहारमधील 50,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे.

  • Written By: Last Updated:

Budget 2025 Big Benifit For Bihar: केंद्र सरकार सत्तेत राहण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर येत्या आठ महिन्याने बिहारची विधानसभा निवडणूक आहे. या राज्यात भाजप आणि नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल संयुक्त यांची सत्ता आहे. या राज्यात पुन्हा सत्ता येण्यासाठी आणि नितीशबाबू यांना खुश ठेवण्यासाठी केंद्र अर्थसंकल्पात (Budget 2025) बिहारसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. बिहारमधील (Bihar) शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कोसी प्रोजेक्ट, विमानतळ, मखना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केलीय.

अर्थसंकल्प जाहीर.. रेल्वेला अर्थमंत्र्यांकडून दे धक्का! गुंतवणूकदारांना शेअर बाजारात बसला फटका

पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यामुळे बिहारमधील 50,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे. बिहारमध्ये मखना या पदार्थाचे उत्पादन जास्त होते. बिहारमधील शेतकरी देशभरात, परदेशात मखना निर्यात करत असते. त्यामुळे बिहारमध्ये मखना बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अन्न प्रक्रिया उद्योग केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचा मखना उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देशातील पाच आयआयटी संस्थांमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. त्याचा साडेसहा हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तर पाटणा येथील आयआयटीचा विस्तार केला जाणार आहे. गेल्या 10 वर्षांत 23 आयआयटीमधील विद्यार्थ्यांची संख्या 65 हजारवरून 1.35 लाखांपर्यंत वाढली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. पाटणा विमानतळाचा विस्तार पाटणा विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. तर बिहटा येथे ब्राउनफिल्ड विमानतळाची घोषणा करण्यात आली आहे.

Budget 2025 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की…

नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर केंद्राची सत्ताही नितीश कुमार यांच्या निर्णयावर आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे बारा खासदार असल्याने बिहारला केंद्रीय अर्थसंकल्पात झुकते माप मिळाले आहे. मागील बजेटमध्ये केंद्राने बिहारला 59 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात रस्ते विकास, ऊर्जा आणि पूर व्यवस्थापनेसाठी पैसे होते. नितीश कुमार यांनी बिहारला स्पेशल राज्याचा दर्जा किंवा स्पेशल पॅकेज द्यावे, अशी मागणी केली होती. ही मागणी अद्याप केंद्राने मंजूर केलेली नाही. परंतु अर्थसंकल्पात महत्त्वाचे प्रकल्प घेतले आहेत.

follow us