Stock Market History On Budget Day : नवीन वर्षाचं जंगी सेलिब्रेशन झालं की, सर्वांच्या नजर लागतात त्या म्हणजे देशाच्या बजेटकडे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असून, यंदा पहिल्यांदाचा रविवारी बजेट लोकसभेत सादर केले जाणार आहे. मात्र, या दिवशी सर्वांचं लक्ष असतं ते म्हणजे शेअर मार्केटकडे. गेल्या 10 वर्षात बजेटच्या दिवशी शेअर मार्केटचा ग्राफ कसा होता? या दिवशी कितीने मार्केट वाढलं अन् घसरलं याचाच घेतलेला हा सारांश…
Budget 2026 : अर्थसंकल्पापूर्वी सादर होतो ‘इकोनॉमिक सर्व्हे’; 75 वर्षांपासून सुरू आहे परंपरा…
गेल्या 10 वर्षातील बजेटच्या दिवशी शेअर मार्केटची आकडेवारी बघितली तर, सेन्सेक्स-निफ्टी पाच वेळा मजबूत वाढीसह, चार वेळा घसरणीसह आणि एकदा फ्लॅट क्लोजिंगसह बंद झाला आहे. सहसा अर्थसंकल्पाच्या दिवशी, लोकांचे लक्ष बाजाराच्या कामगिरीवर असते, त्यामुळे सध्या दिसणारे चढउतार यंदाच्या म्हणजेच 2026 च्या अर्थसंकल्पाच्या दिवशीही सुरू राहतील का? हे पाहणे मनोरंजक असेल.
गेल्या वर्षी काय होती परिस्थिती
1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 2025-2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी मार्केटमध्ये कमालीची अस्थिरता होती. बाराजाची सुरूवात सकारात्मक झाली. मात्र, अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान भांडवली नफा कराची घोषणा करताच सेन्सेक्स 1,200 अंकांनी तर, निफ्टी 400 अंकांनी धाडकन कोसळले. बाजार बंद होईपर्यंत यात सुधारणा जरी झाली तरी, दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले.
फायनान्स बिल म्हणजे काय? अर्थसंकल्पातील घोषणांना कायदेशीर रूप देणारा कणा
याशिवाय 2023 बद्दल बोलायचे झाले तर, 1 फेब्रुवारी रोजी, बीएसई सेन्सेक्स 1223 अंकांच्या वाढीसह 60,773 च्या पातळीवर पोहोचला होता, परंतु शेवटी, तो सुरुवातीचा फायदा गमावून फक्त 158 अंकांच्या वाढीसह 59,708 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 46 अंकांनी घसरून 17,616.30 वर बंद झाला.
2026-2022 पर्यंत बजेट डे मार्केट हालचाली
