Lucknow Building Collapsed : लखनौमध्ये (Lucknow) एक भीषण अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रान्सपोर्ट नगरमधील एक इमारत (Building Collapsed) अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, या इमारतीमध्ये अनेक औषधी कंपन्यांची गोदामे आहे. जेव्हा इमारत कोसळली तेव्हा गोदामात अनेक कामगार उपस्थित होते. सध्या बचाव कार्य सुरु असून आतापर्यंत 28 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे तर या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट नगरमध्ये शनिवारी सायंकाळी अचानक इमारत कोसळली. इमारतीच्या आजूबाजूला भरपूर पाणी असल्याने इमारतीचा पाया कमकुवत झाला त्यामुळे ही इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कार आणि ट्रकही अडकले आहे याशिवाय अनेक मजूर देखील ढिगाऱ्याखाली दबले गेले. सध्या एसडीआरएफ (SDRF) आणि एनडीआरएफची (NDRF) टीमकडून बचाव कार्य सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत 28 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे.
‘शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या बायकोला माहिती नसते तर …, आव्हाडांचा फडणवीसांना खोचक टोला
24 जण जखमी
तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांमध्ये एका वृद्ध महिलेचा समावेश असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेसह इतरांच्या सिटी स्कॅन, एक्स-रे आणि इतर चाचण्या केल्या जात आहेत. सर्व जखमींवर आवश्यक उपचार करण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय शंकर त्रिपाठी यांनी सांगितले.