लखनौ कोर्टात आणखी एका गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात हल्लेखोर

लखनौ कोर्टात आणखी एका गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात हल्लेखोर

Sanjeev Maheshwari Jeeva Murder: उत्तर प्रदेशातील लखनौ कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर वकिलाच्या वेशात होता. संजीव माहेश्वरी हा मुख्तार अन्सारीचा शूटर होता. संजीव माहेश्वरी हा भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतील आरोपी होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गोळीबारात चार ते पाच जण जखमी झाले आहेत. (Gangster Sanjeev Maheshwari shot dead in Lucknow court)

संजीव माहेश्वरी उर्फ जीवा हा पश्चिम यूपीचा कुख्यात गुंड होता. पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. जखमी अवस्थेत हल्लेखोराला पोलिसांनी रुग्णालयात नेले आहे. विजय यादव यांचा मुलगा श्यामा यादव राहणार केरकट जिल्हा जौनपूर असे मारेकऱ्याचे नाव आहे. पोलीसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीला संपवलं; पेट्रोल टाकत जाळला मृतदेह, वेबसिरीज पाहून केलं प्लॅनिंग

या घटनेनंतर वकिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वकिलांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हल्लेखोराने सहा गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. न्यायालयाच्या आवारात रक्ताचे डाग पडले आहेत. भिंतींवरही रक्ताचे डाग आहेत. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह तेथून बाहेर काढला.

संजीव जीवा कोण होता?
संजीव माहेश्वरी जीवा हा शामली जिल्ह्यातील रहिवासी होता. ९० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच त्याचे गुन्हेगारी विश्वात संबंध होते. त्याच्यावर 22 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. सुरुवातीच्या काळात तो दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करायचा. नोकरीच्या वेळी त्याने दवाखान्याच्या संचालकाचे अपहरण केले होते.

Dr. Gaurav Gandhi : सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्टलाच ह्रदयविकाराचा झटका; 41 व्या वर्षी जगाचा निरोप

कोलकातामध्ये एका व्यावसायिकाच्या मुलाचेही अपहरण करून 2 कोटींची खंडणी मागितली होती. 10 मे 1997 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येप्रकरणी त्याचे नाव समोर आले. तो कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. नुकतीच जिवाची मुझफ्फरनगरमधील सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जिल्हा प्रशासनाने जप्त केली होती.

ब्रम्हदत्त द्विवेदी कोण होते?
ब्रम्हदत्त द्विवेदी हे भाजपचे मोठे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या जवळचे होते. प्रसिद्ध गेस्ट हाऊसच्या घटनेवेळी त्यांनी मायावतींना वाचवले होते. 10 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांची हत्या झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube