Download App

मुख्यमंत्री शिवराज चौहान बनले बुलडोझर मामा; आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या आरोपीचे घर उध्वस्त

Chief Minister Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणावर खुलेआम लघवी केल्याचा आरोप असलेला भाजप नेता प्रवेश शुक्ला याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवराज सरकारने आरोपी शुक्लाच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रशासनाचा बुलडोझर शुक्लाच्या घराजवळ पोहोचला होता. यानंतर त्यांच्या घराचा काही भाग पाडण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी प्रवेश शुक्लावर एनएसएस लावला आहे.

बुलडोझर घरावर चालवल्याचे पाहून आरोपीची आई आणि काकू बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान आरोपीच्या घराभोवती मोठ्या संख्येने पोलिस उपस्थित होते. काल रात्रीच पोलिसांनी प्रवेश शुक्लाला अटक केली होती. आरोपीला त्याच्या गावाजवळून पकडण्यात आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शुक्लाविरुद्ध एससी, एससी अॅक्ट आणि एनएसएसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

खलिस्तानी समर्थ गुरपतवंत सिंह पन्नूचा अमेरिकेत रस्ते अपघातात मृत्यू

सोशल मीडियावर मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक आदिवासी मुलगा जमिनीवर बसला आहे, त्याच्या जवळ उभा असलेला व्यक्ती त्याच्यावर लघवी करत होता. यादरम्यान, जमिनीवर बसलेली व्यक्ती घाबरलेली असल्याचेही दिसून येत आहे. तरुणावर लघवी करणारा दुसरा कोणी नसून भाजप आमदार केदार शुक्ला यांचा कार्यकर्ता प्रवेश शुक्ला होता.

गडकरींचा दावा, पेट्रोल होणार 15 रुपये प्रतिलिटर, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार गाड्या

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, ‘सिधी जिल्ह्याचा एक व्हायरल व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे, मी प्रशासनाला दोषीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि एनएसए देखील लागू करण्यात यावे. ‘ त्याचवेळी राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, आरोपीला अटक करण्यात आली आहे, एनएसए कारवाई करत आहे. त्याचे घर अतिक्रमण केलेल्या जागेवर असेल तर त्यावर बुलडोझर चालवा.

Tags

follow us