Download App

ICICI बँकेत खातं उघडायचंय? मग, खात्यात 50 हजार ठेवा; बँकेचा अजब नियमाने वाद वाढला

खासगी बँकिंग क्षेत्रातील मोठी बँक आयसीआयसीआय बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा निर्णय धक्का देणाराच आहे.

ICICI Bank New Rule : खासगी बँकिंग क्षेत्रातील मोठी बँक आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank New Rule) एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा निर्णय धक्का देणाराच आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून बँकेने नवीन बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रकमेच्या नियमात बदल केला आहे. या बँकेत नव्याने बचत खाते सुरू करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या खात्यात किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत.

याचा अर्थ असा की महापालिका आणि शहरी क्षेत्रातील खातेधारकांना या बँकेत नवीन खाते सुरू केल्यानंतर खात्यात किमान 50 हजार रुपये बॅलन्स ठेवावा लागेल. याआधी ही मर्यादा 10 हजार रुपये होती. या व्यतिरिक्त निमशहरी ग्राहकांसाठी 25 हजार रुपये (आधी 5 हजार रुपये) आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी 10 हजार रुपये (आधी 5 हजार रुपये) करण्यात आले आहेत.

कुंपणच लागलं शेत खायला; बँकेतही पैसे सुरक्षित नाहीत, मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून काढले पैसे

बँकेने नियमात केलेला हा बदल येत्या 1 ऑगस्टनंतर बँकेत उघडल्या जाणाऱ्या नवीन खात्यांवर लागू होणार आहेत. जुन्या खात्यांसाठी हा नियम नाही. ज्या लोकांकडून बँकेच्या या अटी पाळल्या जाणार नाहीत त्यांनी थकीत रकमेच्या 6 टक्के किंवा 500 रुपये या दोन्हीत जी रक्कम असेल तितका दंड भरावा लागेल. या निर्णयानंतर बँक आता सर्वात महागड्या खासगी बँकांच्या यादीत समाविष्ट झाली आहे.

विशेष म्हणजे अनेक बँकांनी बॅलन्सवर (Minimum Balance) आकारल्या जाणाऱ्या दंडाची तरतूद रद्द केली आहे. परंतु, आयसीआयसी बँकेने मात्र वेगळी वाट धरली आहे. एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक शहरी भागातील नव्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम 10 हजार रुपयेच आकारत आहेत. त्यातुलनेत आयसीआयसीआय बँकेने या रकमेत मोठी वाढ केली आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट

बँकेच्या या निर्णयावर लोकांचा संताप सहाजिकच होता. तसा तो दिसलाही. लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संतापाला वाट करुन दिली. रिजर्व बँकेने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी अनेकांनी केली आहे. मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांसाठी ही अट खूपच जाचक आहे. यामुळे या लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.

काही लोकांनी तर आयसीआयसीआय बँकेतील आले खाते बंद करण्याचीही धमकी दिली आहे. श्रीमंत ग्राहकांना बँकेकडून प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप काहींनी केला आहे. या देशात आजही 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली राहत आहेत आणि आयसीआयसीआय बँकेला वाटतं की 50 हजार रुपयांचा किमान रकमेचा निर्णय एक मास्टरस्ट्रोक आहे, अशी प्रतिक्रिया एका सोशल मीडिया युजरने दिली.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG ते बँकिंगपर्यंत बदल, थेट परिणाम तुमच्या खिशावर

follow us