Download App

जीएसटी संकलनाने सरकारची तिजोरी फुगली! एप्रिल महिन्यात केला विक्रम; वाचा सविस्तर

देशभरात लोकसभेच्या रणसंग्राम सुरू असताना सरकारसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एप्रिल 2024 मध्ये विक्रमी जीएसटी संकलन झालं आहे.

Image Credit: letsupp

GST Collection :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारसाठी मोठी बातमी समोर आलीये. एप्रिल 2024 साठी GST संकलनाची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये जीएसटी वस्तू आणि सेवा कराने 2024 एप्रिलमध्ये विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज 1 मे रोजी वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी म्हणजे 12.4 टक्के हे संकलन आहे. देशांतर्गत व्यवहारामध्ये 13.4 टक्के वाढ आणि आयात 8.3 टक्क्यांची झाली आहे.

 

1.51 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ

एप्रिल 2024 साठी पूर्णत: जीएसटी महसूल 1.92 लाख कोटी रुपये आहे. जो परताव्याच्या हिशेबात एप्रिल 2023 च्या तुलनेत 17.1 टक्क्यांनी लक्षणीय वाढ दाखवत आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जीएसटी संकलन सकारात्मक असल्याचं दाखत आहे. यामध्ये 2017-18 मध्ये 1 लाख कोटी रुपये. तसंच, 2022-23 मध्ये सरासरी 1.51 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे.

 

95,138 कोटी रुपयांचा महसूल

मार्च 2024 महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात एकूण संकलनात 17.81 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये एप्रिल 2024 मध्ये केंद्र सरकारने संकलित केलेल्या जीएसटीमधून केंद्रीय जीएसटीला 50,307 कोटी रुपये आणि राज्य जीएसटीला 41,600 कोटी रुपये जमा केले. यामुळे केंद्रीय जीएसटीसाठी 94,153 कोटी रुपये आणि 95,138 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.

 

लक्षणीय वाढ झाली

जीएसटी संकलनाने 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये जीएसटी संकलनातील प्रत्येक घटकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. CGST, SGST, IGST आणि उपकर विभागांचा समावेश आहे. यामध्ये बनावट इनव्हॉइसिंग आणि नोंदणींशी लढण्यासाठी कठोर उपाययोजनांमुळे राज्याच्या तिजोरीत GST संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे.

follow us

वेब स्टोरीज