7th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने काही कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगतेतील काही निश्चित कॅटेगरीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामान्य दरापेक्षा दुप्पट वाहतूक भत्ता मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांना या निर्णयाची माहिती दिली असून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
अर्थ मंत्रालयाने विभागांसाठी एक परिपत्रक काढले आहे. यात म्हटले आहे की 15 सप्टेंबर 2022 जारी केलेल्या सूचनांत काही बदल करण्यात येत आहेत. नव्या बदलानुसार दिव्यांगता श्रेणींची एक नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दुप्पट वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे. नव्या आदेशानुसार दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 अंतर्गत गतीशील विकलांगता, रक्त संबंधी विकलांगता आणि मल्टीपल डिसॅबिलिटी प्रकारातील कर्मचाऱ्यांनी काही अटी शर्तींसह दुप्पट वाहतूक भत्ता मिळेल.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, संभाजीनगर परभणी रेल्वे लाईनसाठी 2,179 कोटी मंजूर
दिव्यांग कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कामकाजासाठी रोज प्रवास करावा लागतो. यातही त्यांना अनेक अडचणी येतात. या गोष्टींचा विचार करून सरकारने या कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.