Download App

कमालच! नॉन व्हेजपेक्षा व्हेज थाळी महाग; नव्या अहवालात धक्कादायक माहिती

CRISIL Report on Food Inflation : देशभरात महागाई वेगाने वाढत चालली आहे. किरकोळ महागाई चार (Retail Inflation) टक्क्यांपेक्षा खाली आली आहे मात्र लोकांना याचा फारसा फायदा झाल्याचे दिसत नाही. कारण खाद्य पदार्थांची महागाई (Food Inflation) वाढलेलीच आहे. या परिस्थितीवर एका अहवालाने शिक्कमोर्तब केलं आहे. यामध्ये म्हटले आहे की आता घरी तयार करण्यात आलेले जेवण सुद्धा महाग झाले आहे. बटाटे, टोमॅटो आणि कांद्याचे (Price Rise) भाव इतके वाढले आहेत की घरातील व्हेज थाळी मागील वर्षाच्या तुलनेत 11 टक्के महाग झाली आहे.

क्रिसिल रेटिंग एजन्सीच्या रिपोर्टनुसार (CRISIL Report) सप्टेंबर 2023 मध्ये शाकाहारी थाळीची सरासरी किंमत 28.1 रुपये होती. या वर्षातील सप्टेंबर महिन्यात यामध्ये वाढ होऊन किंमत 31.2 रुपये झाली. अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांचे खाणे 11 टक्क्यांनी खर्चिक झाले आहे.

भाजीपाल्याच्या वाढत्या किंमती जबाबदार

क्रिसिलने Roti, Rice Rate नावाने एक रिपोर्ट जारी केला आहे. भाजीपाल्याच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य लोकांचे जेवणाचे ताट महाग झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. एक साधारण व्हेज थाळीतील 37 टक्के खर्च हा फक्त भाजीपाल्याचा असतो. या व्यतिरिक्त मागील वर्षभरात पीठ, तांदूळ, डाळ आणि तेलाचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Veg-Non veg Price : फेब्रुवारीमध्ये असं काय झालं? व्हेज महाग तर नॉन-व्हेज थाळी झाली स्वस्त

कांदा, टोमॅटो अन् बटाटे किती महाग

या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात कांदा, टोमॅटो आणि बटाट्याच्या किमती वाढल्या आहेत. कांद्याचे भाव 53 टक्के, बटाटे 50 टक्के तर टोमॅटोचे दर 18 टक्क्यांनी वाढले आहेत. यामागे कांदा आणि बटाट्याचा कमी पुरवठा हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोचे उत्पादन कमी झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत डाळींच्या किमतीत 14 टक्के वाढ झाली आहे. तर वर्षाच्या सुरुवातीला किमतीत कपात झाल्याने इंधनाच्या किमतीत 11 टक्के घट झाली आहे.

कमालच, नॉन व्हेज थाळी स्वस्त

मांसाहारी भोजनाची थाळी या काळात स्वस्त झाली आहे. साधारणपणे शाकाहारी जेवणाच्या तुलनेत मांसाहारी जेवण महाग असते. परंतु या अहवालात तर नॉन व्हेज थाळी शाकाहारी थाळी पेक्षा स्वस्त असल्याचे म्हंटले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात नॉन व्हेज थाळीच्या दरात दोन टक्के घट झाली आहे. त्यामुळे सध्या या थाळीची किंमत 59.3 रुपये इतकी झाली आहे. ब्रॉयलरची किंमत 13 टक्क्यांनी कमी झाली आहे. या खाद्य पदार्थाचा नॉन व्हेज थाळीत 50 टक्के सहभाग असतो.

क्रिसिलचा हा रिपोर्ट (CRISIL Report) अशा वेळी आला आहे जेव्हा रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात द्वैमासिक मौद्रिक धोरण जाहीर करणार आहे. या धोरणाच्या माध्यमातून देशातील महागाईवर नियंत्रण मिळवण्यात येते. भारतात मौद्रीक धोरण निश्चित करण्यात किरकोळ महागाईची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. यातील एक मोठा भाग हा फूड प्राईस इंडेक्सचा असतो.

एनपीएस वात्सल्य योजना आहे तरी काय? मुलांच्या भविष्याची काळजीच मिटेल; जाणून घ्या, सर्वकाही..

follow us