Download App

पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार; व्हॅटिकन येथे विविध देशांच्या प्रमुखांसह लाखो नागरिकांची उपस्थिती

पोप फ्रान्सिस यांचा जीवनभर जरी वंचित आणि दुर्बल वर्गाच्या हितासाठी झटले. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यात जगभरातील

  • Written By: Last Updated:

Pope Francis on Funeral : कॅथॉलिक पंथीय श्रद्धावान भाविकांनी शनिवारी पोप फ्रान्सिस यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्यसंस्काराला लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्‍थित होते. या भावपूर्ण अंतिम विधींवर पोप यांच्या सुसंस्कारी भूमिकेचे प्रतिबिंब उमटले होते. यावेळी त्यांना जनतेचे पोप म्हणून गौरविण्यात आले. (Francis) सेंट पीटर स्क्वेअरमध्ये झालेल्या या अंत्यसंस्कार विधीनिमित्त जमलेल्या जनसमुदायात विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, राजघराण्यांचे सदस्य उपस्थित होते. पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव व्हॅटिकन शहरात दुसऱ्या टोकाला असलेल्या सेंट मेरी मेजर बॅसिलिकामध्ये नेण्यात आले, जिथे कैदी आणि स्थलांतरित नागरिक त्यांचे स्वागत केले. येथे पोप यांचा दफनविधी करून त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.

सुमारे अडीच लाखांच्या वर भाविक अंतिम विधीत सहभागी झाले. हजारो जणांनी वाहनताफ्याच्या मार्गालगत गर्दी करून पापा फ्रान्चेस्को असा पोप यांचा जयघोष केला. अंत्ययात्रेच्या सहा किलोमीटरच्या मार्गालगत अडीच लाखांवर शोकाकुल भाविक जमले होते. पोप यांचे पार्थिव ठेवलेली साधी लाकडी पेटी ठेवलेल्या खास पोप यांच्या जुन्या वाहनाचे स्वागत केले. पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव नंतर स्विस सुरक्षारक्षकांच्या पथकासमवेत सेंट मेरी मेजर बॅसिलिकामध्ये नेले.

अर्जेंटिनाचे जॉर्ज कसे बनले ख्रिस्तीयांचे सर्वात मोठे धर्मगुरू? पोप फ्रान्सिसची संपूर्ण कहाणी, जाणून घ्या सविस्तर

यापूर्वी, कॉलेज ऑफ कार्डिनलचे ९१ वर्षीय डीन कार्डिनल जिओव्हानी बॅटिस्टा रे यांनी केलेल्या प्रवचनात पोप फ्रान्सिस यांच्याविषयी जनतेचे पोप असं गौरवोद्गार काढले. आपल्या अत्यंत भावनिक आणि संवादी शैलीतील संबोधनात त्यांनी सांगितले, की पोप फ्रान्सिस हे असे गुरू होते, जे आपल्या अत्यंत उत्स्फूर्त, अनौपचारिक व स्वाभाविक शैलीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकले. ते जनसामान्यांत वावरलेले पोप होते. ते सर्वांशी खुल्या दिलाने वागले. पोप यांच्या संपूर्ण जीवनप्रवासात चर्च ही सर्वांसाठीचे घर आहे. त्याचे दरवाजे सर्वांसाठी नेहमीच खुले आहेत, हाच त्यांचा प्रमुख संदेश हाच होता.

वंचित, दुर्बलांसाठी जीवन अर्पण

पोप फ्रान्सिस यांचा जीवनभर जरी वंचित आणि दुर्बल वर्गाच्या हितासाठी झटले. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यात जगभरातील सामर्थ्यवान नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडेन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर, तसेच प्रिन्स विल्यम आणि युरोपातील इतर राजघराण्यांचे सदस्य यांच्यासह १६० हून अधिक अधिकृत शिष्टमंडळांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. पोप फ्रान्सिस मूळचे अर्जेंटिनाचे असल्याने अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जेव्हिअर मीलई यांना विशेष स्थान देण्यात आले. त्यांचे पोप यांच्याशी फारसे सौहार्दाचे संबंध नव्हते. तसेच पोप त्यांच्या कार्यकाळात मायदेशी भेट देण्यास गेले नसल्याने अनेक अर्जेन्टिनावासीय नाराज झालं होतं.

follow us