Download App

अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार! अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स लागला हाती

Ahmedabad plane crash या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. ब्लॅक बॉक्समुळे विमानाचे खरे कारण समोर येणार आहे.

cause of Ahmedabad plane crash will revealed black box of crashed plane recovered : अहमदाबादातील मेघानीनगर परिसरात 12 जून गुरुवारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचं विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash) एकच खळबळ उडाली. या विमानात 230 प्रवाशी होते. तर 12 क्रू मेंबर्स देखील उपस्थित होते. माहितीनुसार या विमान अपघातामध्ये विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र विमान अपघाताचे कारण काय? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी लष्कराचे 130 जवान बचावकार्य करत आहे. तसेच आता अखेर या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. ब्लॅक बॉक्समुळे विमानाचे खरे कारण समोर येणार आहे.

स्टारलिंक प्रोजेक्ट…देशविरोधी अन् अपारदर्शी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध

आज शुक्रवारी 13 जून रोजी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने या राखेच्या ढिगाऱ्या खालून एक डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर मिळवला आहे. तसेच या अपघातग्रस्त विमानाचा (Ahmedabad Plane Crash) ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. हे दोन्ही डिव्हाईस अपघाताचं कारण शोधण्यास महत्त्वाचे असतात. तर यावर बोलताना एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, हा डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर आहे. हा ढीगाऱ्या खाली मिळाला. फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने याचाी तपासणी केली जाईल. ज्यातून या दुर्घटनेचे धागेदोरे मिळतील.

आदित्य ठाकरेंना शुभेच्छा अन् ठाकरेंना भेटण्याची इच्छा; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

ब्लॅक बॉक्स दोन प्रकारच्या मशीन्सपासून बनलेले एक प्रकारचे उपकरण असते. ब्लॅक बॉक्स उड्डाणाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांची नोंद करतो. FDR- फ्लाइट डेटा रिसर्च या मशीनमध्ये विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती, उड्डाण मार्ग, पायलटने केलेल्या क्रियाकलापांसारखी तांत्रिक माहिती समाविष्ट असते. तर CVR– कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या मशीनमध्ये पायलट आणि सह-पायलटमधील संभाषण, अलार्म ध्वनी आणि इतर महत्त्वाचे ऑडिओ पुरावे असताता. ज्याचा वापर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय संभाषण झाले हे शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. सीव्हीआर आणि एफडीआर ही अशी उपकरणे आहेत जी विमान अपघातापूर्वी माहिती गोळा करतात. त्याच्या मदतीने तज्ञ विमानात तांत्रिक समस्या होती की मानवी चुकीमुळे अपघात (Ahmedabad Plane Crash) झाला हे शोधतात.

बीकन सिग्नलच्या मदतीने ब्लॅक बॉक्स शोधला जातो

ब्लॅक बॉक्स विमानात (Ahmedabad Plane Crash) एका खास आणि अतिशय सुरक्षित ठिकाणी बसवला जातो जेणेकरून अपघातानंतरही तो सुरक्षित ठेवता येईल. आग आणि पाण्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी ते तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तो शोधण्यासाठी एका विशेष प्रकारच्या सिग्नलचा वापर केला जातो, ज्याला बीकन सिग्नल म्हणतात. या बीकन सिग्नलसहच ब्लॅक बॉक्स सापडतो.

follow us