आदित्य ठाकरेंना शुभेच्छा अन् ठाकरेंना भेटण्याची इच्छा; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

Best wishes to Aditya Thackeray and desire to meet Thackeray; What exactly Sanjay Shirsat say : मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांदरम्यान फडणवीसांना भेटलेल्या राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. असं म्हणत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
काय म्हणाले संजय शिरसाठ?
ठाकरे कुटुंब एकत्र याव यावर आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली यात काही राजकीय चर्चा झाल्या आहे. त्या त्या दोघांनीच सांगणं योग्य आहे. कारण शरद पवार अजित पवार यांच्याही भेटी होताय. तसेच मी उद्धव ठाकरे यांनी बोलावले तर भेटायला जाईल.यात परत राजकीय चर्चा करू नका.
वायएसआर ते विजय रुपाणी… विमान, हेलिकॉप्टर अपघातात देशाने मोठे नेते गमविले
तसेच आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.पोरांन चांगले राहावं,चांगलं वागाव,लवकर लग्न करावं. वडिलांसुद्धा सुद्धा त्रास होता कामा नये. याची काळजी घ्यावी. भविष्यात चांगला मोठा नेता व्हावा या मनापासून शुभेच्छा! संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. असं म्हणत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
दैव बलवत्तर! होस्टेलवर विमान कोसळलं तरीही अकोल्याची ऐश्वर्या वाचली; आग अन् धुरातून केली सुटका..
त्याचबरोबर यावेळी त्यांनी निधीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर टीका करण्यात येत होती. त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अगोदर मी (Sanjay Shirsat) अजित पवारांवर निधीवरून टीका केली होती. मात्र आता मला पण निधी दिला जात आहे. त्यामुळे माझी नाराजी नाही. त्यानंतर माझी आणि दादाची भेट झाली. असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Ahmedabad Plane Crash : घटनास्थळी एक नाही दोन चमत्कार; आगीच्या गोळ्यातही ‘भगवद्गीता’ सुरक्षित
तर उठावानंतर मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचं काम केलं होत. त्या अर्थाने मी बोललो. मला इम्तियाज जलील बद्दल बोलायचं नाही.याचे बोलवत धनी कोण आहे माहिती आहे. मला थोडा वेळ द्या पूर्ण ताकदीनिशी मी बोलेल. असंही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.