CBSE 12 वीच्या Toppers ची आकडेवारी जाहीर; पुण्यात 87 टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले 95 टक्क्यांहून जास्त गुण

CBSE Toppers : CBSE कडून काही दिवसांपूर्वी इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर आता सीबीएसईकडून वर्षी परीक्षेत अव्वल स्थान

CBSE Toppers

CBSE Toppers

CBSE Toppers : CBSE कडून काही दिवसांपूर्वी इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर आता सीबीएसईकडून वर्षी परीक्षेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या, तसेच इतर संबंधित तपशीलही जाहीर करण्यात आली आहे. CBSE ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील शहरांनी निकालांमध्ये बाजी मारली आहे. तर पुण्यात 87 टक्के विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांहून जास्त गुण मिळवले आहे. या वर्षी एकूण 85.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अव्वल स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या

CBSE ने दिलेल्या माहितीनुसार, 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17,113 इतकी आहे. याचा अर्थ असा की, 17,000 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश ‘गुणवंतांच्या यादी’मध्ये (Toppers’ List) आहे. याव्यतिरिक्त, 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 94,028 इतकी आहे. 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी एकूण विद्यार्थी संख्येच्या 0.97 टक्के आहेत, तर 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 5.32 टक्के आहेत.

निकालांमध्ये मुलींनी मारली बाजी

CBSE इयत्ता 12 वीच्या निकालांमध्ये, मुलींनी या वर्षी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. या वर्षी 88.86 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 82.13 टक्के राहिले. मुलींची कामगिरी मुलांच्या तुलनेत 6.73 टक्क्यांनी अधिक चांगली होती. दरम्यान, तृतीयपंथी (Transgender) विद्यार्थ्यांनी या वर्षीही 100 टक्के यशाचे प्रमाण गाठले आहे.

 95 % पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या

तिरुवनंतपुरम – 95.62
चेन्नई – 93.84
बंगळुरू – 93.19
विजयवाडा – 92.77
दिल्ली पश्चिम – 92.34
दिल्ली पूर्व – 91.73
अहमदाबाद – 90.60
गुरुग्राम – 88.45
लुधियाना – 87.92
पुणे – 87.32
अजमेर – 86.78
पंचकुला – 85.73
रांची – 85.01
गुवाहाटी – 83.41
लखनौ – 82.21
भुवनेश्वर – 81.71
डेहराडून – 81.42
रायपूर – 80.88
भोपाळ – 79.43
नोएडा – 79.02
पाटणा – 74.45
प्रयागराज – 72.43

Exit mobile version