Download App

Ola वर केंद्राची मोठी कारवाई, रिफंड प्रक्रियेसाठी नियमांमध्ये करावे लागणार बदल

CCPA Action Against Ola : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने ऑनलाइन राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म Ola ला नियमांमध्ये बदल करण्याचे निर्देश

  • Written By: Last Updated:

CCPA Action Against Ola : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने ऑनलाइन राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म Ola ला नियमांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीची रिफंड पद्धत (Refund Method) निवडता येणार आहे.

या प्रकरणात सिसीपीएने म्हटले आहे की, ग्राहकांना रिफंड थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा कूपनद्वारे देण्यात यावे. तसेच ओला ॲपद्वारे बुक केलेल्या सर्व ऑटो राइड्ससाठी ग्राहकांना बिले किंवा पावती चालान जारी करण्याचे निर्देश देखील सिसीपीएने Ola ला दिले आहे.

सध्या फक्त कूपन आधारित रिफंड सुविधा ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सिसीपीएला आढळून आले की जेव्हा जेव्हा ग्राहकांनी Ola ॲपवर तक्रार नोंदवली तेव्हा कंपनी रिफंड पॉलिसी म्हणून ग्राहकांना फक्त एक कूपन कोड प्रदान करत होते ज्याच्या उपयोग ग्राहकांना त्यांच्या पुढच्या राईडसाठी करता येत होता मात्र ग्राहकांना कंपनीकडून बँक खात्यात रिफंड हवा आहे की कुपन द्वारे रिफंड हवा आहे याचा पर्याय देण्यात येत नव्हता त्यामुळे आता सिसीपीएने Ola ला नियमांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहे.

सिसीपीएनुसार कंपनीची ही पॉलिसी ग्राहक हक्कांचे उल्लंघन करणारी आहे. रिफंड याचा अर्थ असा होऊ शकत नाही की कंपनी ग्राहकांना दुसरी राइड घेण्यास भाग पाडते. त्यामुळे आता Ola ला आपल्या नियमांमध्ये बदल करावा लागणार आहे. ज्याच्या फायदा हजारो ग्राहकांना होणार आहे.

बिल डाउनलोड करणे नियमांचे उल्लंघन नाही

तसेच जर ग्राहक ओलावर बुक केलेल्या ऑटो राइडचे बिल डाउनलोड करत असेल तर हे नियमांचे उल्लंघन नाही असं देखील सिसीपीएने म्हटले आहे. यापूर्वी जर एकदा ग्राहक ऑटो राइडचे बिल डाउनलोड करत असेल तर त्याला ऑटो सेवेच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल झाल्यामुळे बिल मिळणार नाही, असे सांगण्यात येत होते.

Babar Azam : मोठी बातमी! बाबर आझमला पाकिस्तान बोर्डाचा धक्का, संघातून डच्चू

मात्र विकल्या गेलेल्या वस्तू किंवा पुरवल्या जाणाऱ्या सुविधांचे बिल न देणे हे ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन आहे.असं देखील या प्रकरणात सिसीपीएने म्हटले आहे.

follow us

संबंधित बातम्या