CBSE Board new Decision : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात CBSE ने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशातील CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेही स्थानिक पातळीवर शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून असे निर्णय घेत असते. आता तर सीबीएसईनेच सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत बोर्डाने शाळांना गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. ट
यानुसार शाळेत सर्व आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. क्लासरुम व्यतिरिक्त एन्ट्री आणि एक्झिट ठिकाणे, कॉरिडोर, प्रयोगशाळा अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे प्राधान्याने लावावेत असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. प्रायव्हसीमुळे टॉयलेट आणि वॉशरुम्सना यातून वगळण्यात आले आहे. शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे ही सुरक्षा आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने बोर्डाने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निर्णयामुळे शाळांत घडणारे अनुचित प्रकारांना आळा बसेल असे बोर्डाचे म्हणणे आहे.
आधी शुगर बोर्ड आता ऑइल बोर्ड, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नवी आयडीया; CBSE बोर्डाचा आदेश काय?
शाळांतील सर्व कॅमेरे वर्किंग कंडीशनमध्ये असलेच पाहिजेत. यात कमीत कमी पंधरा दिवसांचे रेकॉर्डिंग ठेवले पाहिजे. यामुळे मुलांना तक्रार करण्यासाठी एक टाइम फ्रेम मिळेल. स्कूल प्रशासनालाही यामुळे चौकशी करण्यास मदत मिळेल. शाळांनी वेळोवेळी सीसीटीव्ही फुटेज आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली पाहिजे. जेणेकरून शाळेच्य आवारात घडणारे गैरप्रकार लक्षात येतील.
बोर्डाच्या या निर्णयाचे अनेक पालकांनी स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की शाळेत मुलांना पाठवल्यानंतर पालकांनी निश्चिंत झाले पाहिजे. शाळांत सध्या अपराधाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी बोर्डाने घेतलेला हा निर्णय चांगला असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे काही शिक्षक आणि पालकांचे म्हणणे आहे की बोर्डाच्या या निर्णायामुळे विद्यार्थी आणि शाळांतील शिक्षकांच्या नैसर्गिक वर्तणुकीवर परिणाम होईल. विद्यार्थ्यांची प्रत्येक क्षणी निगराणी केली जात आहे असा मेसेज यातून जाईल असा सूर काही जणांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हा निर्णय देशातील सर्व सीबीएसई बोर्डाच्या शाळांना बंधनकारक राहील. बोर्डाने याबाबतीत अद्याप वेळमर्यादा निश्चित केलेली नाही.
ब्रेकिंग ! आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय