Parliament Security : संसदेत घुसखोरीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. संसदेत चार जणांनी घुसून स्मोक कॅंडलने धूर सोडल्याने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न (Parliament Security) ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता संसदेत घुसखोळी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता CISF कडे सोपवण्यात आली आहे. याआधी ही जबाबदारी दिल्ली पोलिसांकडे होती.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची राज्यात एंट्री, आरोग्य प्रशासन सतर्क, मुंबईत मास्क सक्ती होणार?
देशाच्या संसदेच्या कामकाजावेळी चार जण सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले. त्यांनी सभागृहात ‘स्मोक बॉम्ब’ सोडला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच घेरलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CISF या विशेष तुकडीकडे संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. CISF ही केंद्र सरकारच्या अनेक इमारतींची सुरक्षा करते. १३ डिसेंबर रोजी संसदेत सुरक्षाभंग झाला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बच्चू कडूंचा मास्टरस्ट्रोक! दादा भुसे आणि झेडपी प्रशासनाला अंधारात ठेवून दिव्यांग भवनाचे उद्घाटन
ससंदेत सुरक्षेच्या प्रश्नावरुन आवाज उठवल्याने विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या तब्बल 150 खासदारांना निलंबित केल्याचं समोर आलं. लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना दोन व्यक्तींनी (सागर शर्मा, मनोरंजन डी) सुरक्षेला बगल देत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यांनी सभागृहात स्मोक बॉम्ब फेकून तो धुर केला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. एका तरुण व तरुणीने (अमोल शिदे, नीलम) बाहेर आंदोलन केले. त्यांनी तानाशाही नही चलेगी, अशा घोषणा दिल्या असता त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चाच नाही; फडणवीसांनी घेतला समाचार
दरम्यान, संसदेत घुसखोरीच्या घटनेवरुन देशभरात राजकारण ढवळून निघालं आहे. याआधी संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांकडे देण्यात आली होती. संसदेत चार जणांनी घुसखोरी केल्याने आता दिल्ली पोलिसांकडून ही जबाबदारी काढून केंद्राच्या अधिपत्याखाली असलेल्या CISF दलाकडे ही जबाबदारी देण्याती आली आहे. त्यामुळे आता पुढील काळात संसदेत घुसखोरी टळणार असल्याचं बोललं जात आहे.