Download App

NEET पेपरफुटी झालीच नाही; केंद्राचा मोठा दावा, सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

NEET UG Exam प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर आज (11 जुलै) केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले

Central Government Claim for NEET UG Exam in Supreme Court : देशभरात वादग्रस्त ठरलेल्या मेडिकल प्रवेश परीक्षा नीट यूजी 2024 (NEET UG Exam) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कठोर भूमिका घेतल्यानंतर आज (11 जुलै) केंद्र सरकारने (Central Government ) न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ज्यामध्ये केंद्राने नीट परिक्षेमध्ये कोणतीही पेपरफुटी झालीच नाही असा मोठा दावा केला आहे.

न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकार म्हटले…

नीट यूजी 2024 प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर आज (11 जुलै) केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ज्यामध्ये केंद्राने म्हटले की, नीट परिक्षेमध्ये कोणतीही पेपरफुटी झालीच नाही. विद्यार्थ्यांच्या गुणांमधील तफावत अभ्यासक्रम कमी केल्यामुळे 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला म्हणून मार्क वाढले आहेत.

राज्यात पुन्हा आमदारांची फोडाफोडी? शिंदे-ठाकरेंसह सर्वांचे आमदार 5 स्टार हॉटेलात रवाना

तसेच या पेपरफुटी संदर्भात IIT मद्रासची मदत घेण्यात आली आहे. तसेच NTA ने स्पष्ट केले की, टेलिग्रामद्वारे पेपरफुटी संदर्भात केलेला दावा फेक आहे. यासाठी जुलैच्या तिस-या आठवड्यात चार राऊंडमध्ये कॉन्सिलिंग होणार आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

केंद्र सरकार पुर्नपरीक्षा घेण्यास अनुकूल नाही

दरम्यान यामध्ये केंद्राने असे देखील सांगितले की, एकूण 153 अनियमितता प्रकरणे समोर आली आहेत. तर समितीच्या शिफारशीवर आधारित 81 उमेदवारांचे निकाल रोखण्यात आले आहेत. 54 उमेदवारांना 3 वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे. मात्र केवळ ‘अप्रमाणित आशंका’ च्या आधारे 23 लाख विद्यार्थ्यांवर पुनर्परीक्षेचा बोजा टाकण्यात येऊ नये. चुकीच्या पद्धतीनं गैरफायदा घेणा-या दोषींना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. याची काळजी घेत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

दूध उत्पादकांसाठीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा; मंत्री विखे पाटलांच्या सूचना

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता आज 11 जुलै रोजी होणार आहे. तर बुधवारी 10 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एनटीए, केंद्र सरकार आणि सीबीआयने प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. पेपरलीकचा फायदा ज्यांना कुणाला झाला असेल त्यांचा शोध घ्या तसेच ज्या केंद्र आणि शहरात पेपर लीक झाले त्याचीही माहिती द्या, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला दिल्या होत्या. त्यानुसार आज (11 जुलै) केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ज्यामध्ये केंद्राने नीट परिक्षेमध्ये कोणतीही पेपरफुटी झालीच नाही असा मोठा दावा केला आहे.

follow us