Download App

केंद्राचा मोठा दणका! भारताविरूद्ध विष ओकणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी

Centre Blocks 16 Pakistan Youtube Channels : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. (Pahalgam Terror Attack) प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण 6.3 कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर (Pakistan Youtube Channels) भारतात बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.

बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज या वृत्तसंस्थांचे यूट्यूब चॅनेल समाविष्ट आहेत. पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या यूट्यूब चॅनेलवर देखील बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इतर हँडलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.

त्याने मला कपडे काढून त्याच्यासमोर..अभिनेत्री नविना बोलेनचे दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप

सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दुर्घटनेनंतर शेजारील देशांमधील तणावपूर्ण संबंध आहे. दरम्यान हे यूट्यूब चॅनेल भारत, त्याच्या सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटे आणि दिशाभूल करणारे कथन आणि चुकीची माहिती प्रसारित करत आहेत. या दुर्घटनेत 25 पर्यटक आणि एका काश्मिरी व्यक्तीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही, असा संदेश कोणी या चॅनेल्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मिळेल.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, आठवड्याचा पहिला दिवस अनेक राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल

दहशतवादी संघटनेने 22 एप्रिल रोजी पहलगामच्या पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. या दिवशी जेव्हा दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला, तेव्हा देशातील निष्पाप पर्यटकांच्या किंकाळ्या घुमल्या. दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांना निर्घृणपणे ठार मारले आणि अनेक जखमी अजूनही रुग्णालयात जीवनमरणाशी झुंज देत आहेत. हा हल्ला केवळ दहशतवादी कृत्य नव्हता तर मानवतेविरुद्ध उघड युद्ध होते. देशभर संतापाची लाट पसरली.

 

follow us