Crime : धक्कादायक ! कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याकडून एमडी अन् सीईओची हत्या…

Bengaluru Crime : कर्नाटकात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने कंपनीचे एमडी आणि सीईओची हत्या केल्याची घटना घडली आहे. माजी कर्मचाऱ्याने कंपनीच्या सीईओची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Bangalore shook! MD and CEO killed by ex-employee of private company) Bengaluru, Karnataka | The […]

Benglour Murder CAse

Benglour Murder CAse

Bengaluru Crime : कर्नाटकात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने कंपनीचे एमडी आणि सीईओची हत्या केल्याची घटना घडली आहे. माजी कर्मचाऱ्याने कंपनीच्या सीईओची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Bangalore shook! MD and CEO killed by ex-employee of private company)

मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास बंगळुरुमधील अमृताहल्ली इथल्या औद्योगिक विकास क्षेत्रात ही घटना घडली आहे. अमृताहल्लीस्थित एरोनिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या टेक कंपनीमधील कार्यालयात हा माजी कर्मचारी फेलिक्स हा दुपारच्या दरम्यान आला होता. कंपनीत येत फेलिक्सने थेट कंपनीचे एमडी पी. सुब्रह्मण्य आणि सीईओ वीनू कुमार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत प्राणघातक हल्ला केला.

अखेर शिवतारेंनी अजितदादांशी जुळवून घेतलं! तोंडभरुन कौतुक करत म्हणाले, ते तर माझे आवडीचे नेते…

कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्राणघात हल्ला केल्यानंतर कंपनीच्या इतर कामगारांकडून आरडा-ओरडा करण्यात आला होता. त्यानंतर तत्काळा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने कंपनीतून धूम ठोकली. घटना घडल्यानंतर तत्काळ कंपनीच्या इतर कामगारांकडून एमडी सुब्रह्यण्य आणि सीईओ वीनू कुमार रुग्णालयात उपचारासाठी नेले.

आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचे डोहाळे जेवण

मात्र, माजी कर्मचाऱ्याने धारदार शस्त्राने वार केल्याने कंपनीचे दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झालेले होते. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांनी जीव सोडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फेलिक्स हा फरार झाला आहे. अधिक तपास करुन आरोपीला लवकरच अटक करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version