Download App

मोठी उलथापालथ! SC च्या सुनावणीपूर्वीच चंदीगडच्या महापौरांचा राजीनामा, 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

  • Written By: Last Updated:

Chandigarh Mayor Resigns : चंदीगडचे नवे महापौर मनोज सोनकर (Manoj Sonkar) यांनी आपल्या पदाचा काल (दि. 18 फेब्रवारी) रोजी रात्री राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष (AAP) आणि काँग्रेसने (Congress) भाजपवर महापौर नियुक्त्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष जितेंद्र मल्होत्रा ​​यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इंडिया आघाडीतील पक्षांना घराणेशाहीची चिंता, ठाकरे-पवारांचे उद्दिष्ट फक्त…; अमित शाहांची घणाघाती टीका 

चंदीगडमध्ये 18 जानेवारीला महापौरपदाची निवडणूक होणार होती. मात्र अनिल मसिह आजारी पडल्यानं निवडणूक पुढे ढकलावी लागली. यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीची तारीख ३० जानेवारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार, 30 जानेवारीला चंदीगडमध्ये महापौरपदासाठी निवडणूक झाली. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने इंडिया अलायन्स अंतर्गत निवडणूक लढवली होती आणि त्यांना मिळून 20 नगरसेवकांची मते मिळाली होती. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांची आठ मते रद्द करून 16 नगरसेवकांचा पाठिंबा असलेल्या भाजपला विजयी घोषित केले. दरम्यान, पक्षाच्या दिग्गजांनी मनोज सोनकर यांना महापौरपदी बसवले.

Rajani Satav : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचे निधन 

दरम्यान, चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवक पूनम देवी, नेहा मुसावत आणि गुरचरण काला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय, कॉग्रेसचे दोन नगरसेवकही भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आपच्या तीन नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडे एकूण 17 नगरसेवक आहेत. याशिवाय एका खासदाराचे मत असून भाजपला शिरोमणी अकाली दलाच्या नगरसेवकाचाही पाठिंबा आहे. अशा स्थितीत भाजपच्या एकूण मतांची संख्या आता 19 झाली आहे. आम आदमी पार्टी-काँग्रेस युतीनंतर आता आम आदमी पार्टी-काँग्रेस युती अवघ्या 17 मतांवर आली आहे, ज्यात आम आदमी पक्षाच्या 10 मतांचा समावेश आहे आणि काँग्रेसची 7 मते समाविष्ट आहेत.

सोनकर यांना हटवण्याची मागणी का झाली?
सोनकर यांची निवड झाल्यानंतर आप-काँग्रेसने सोनकर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. महापौर निवडणुकीत कथित हेराफेरीच्या आरोपावरून आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची तसेच नवीन महापौरांच्या कामकाजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर पहिल्याच सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महापौरांच्या कामकाजाला स्थगिती देत ​​संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बंदी घातली होती. शिवाय, मतपत्रिका सील करण्याचे आदेशही दिले होते.

प्राप्त माहितीनुसार, चंदीगड निवडणुकीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही निवडणुकीवर लक्ष ठेवण्यात आले होते, मात्र निवडणुकीत हेराफेरीचे आरोप होत आहेत. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने निवडणूक रद्द करून पुन्हा महापौर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या सुनावणीपूर्वीच मनोज सोनकर यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला.

अनिल मसिह हे सुनावणीला हजर राहणार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणीत अनिल मसिह हे देखिल हजर राहणार आहेत. महापौर निवडणुकीत रिटर्निंग अधिकारी असलेल्या अनिल मसिह यांना सरन्यायाधीशांनी चांगलेच फटकारले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी रिटर्निंग अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे म्हटले होते. कारण या निवडणुकीत मसिह हे बॅलेट पेपरवर पेन वापरून नगरसेवकांच्य मतांवक मार्किंग करतांना दिसले होते. ज्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड नाराज झाले होते. ‘लोकशाहीची हत्या’ अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. अनिल मसिह हे भाजप अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस होते आणि त्यांच्या देखरेखीखाली चंदीगडमध्ये महापौरपदाची निवडणूक पार पडली, ज्यामध्ये त्यांना पीठासीन अधिकारी करण्यात आले होते. दरम्यान, मसिह यांनाही 19 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहायचे आहे.

 

 

follow us