Download App

गोळीबारानंतर भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले हल्लेखोर…

Uttar Pradesh : गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली होती, त्यानंतर आमच्या कारने यू-टर्न घेतला, हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नसल्याचं भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नूकताच आझाद यांच्यावर सहारनपूरमध्ये गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आझाद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विखेंना धोबीपछाड दिलेल्या ‘गणेश’मध्ये अध्यक्षपदी लहारे, तर उपाध्यक्षपदी दंडवते

पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा मी माझा भाऊ आणि 5 जण कारमध्ये होतो. एका कार्यक्रमासाठी आम्ही कारमध्ये सहारनपूरला गेलो होतो. कारमध्ये प्रवास करीत असतानाच अचानक गोळीबार झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय.

व्हॉट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! टेलीग्रामलासारखे मेसेज पिन करता येणार

तसेच हल्लेखोरांबाबत आता मला व्यवस्थित आठवत नसून माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबार झाला तेव्हा आमच्यासोबत असणाऱ्या एका डॉक्टर सहकाऱ्याला देखील गोळी लागली असावी, असा अंदाज आझाद यांनी व्यक्त केले आहे.

Blind Teaser Out: 4 वर्षांनंतर ती परत आलीय! सोनम कपूरच्या ‘ब्लाइंड’चा टीझर प्रदर्शित

चंद्रशेखर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या गाडीचा नंबर हा हरियाणाचा असून आरोपी हरियाणाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. गोळीबारात एकूण 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गाडीतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबर केला. गोळीबारात आझाद यांच्या कमरेला चाटून गोळी गेल्याचं दिसत असून त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. यासोबतच वाहनांच्या काचाही तुटलेल्या दिसत आहेत.

Tags

follow us