Download App

‘ISRO’च्या मोहिमेत कंपन्यांचीही साथ; ‘L&T’ ने बनवलं ‘लाँच व्हेईकल’ तर ‘BHEL’ ने दिली ‘बॅटरी’..

Chandrayaan 3 Landing : आजचा दिवस भारताच्या इतिहासात अविस्मरणीय असाच ठरणार आहे. चंद्राच्या प्रवासाला निघालेले भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Landing) आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरणार आहे. जर ही किमया साधली गेली तर चंद्रावर (Moon Mission) उतरणारा भारत हा चौथा देश बनेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश ठरेल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला या क्षणाची उत्सुकता लागून राहिलेली आहे.

भारताचे हे तिसरे मिशन आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चांद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात आले होते. आता 40 दिवसांनंतर ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल. या मोहिमेत एल अँड टीसह देशातील मोठ्या कंपन्यांनीही आपले योगदान दिले आहे.

Chandrayan 3 Landing : सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण कसे, केव्हा आणि कोठे पाहता येणार?

भारताची ही मोहिन जवळपास 615 कोटी रुपयांची आहे असे सांगण्यात येत आहे. याआधी 2019 मध्य चांद्रयान 2 च्या विक्रम लँडरला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयश आले होते. अंतरिक्ष सेवांच्या बाबतीत भारत आता पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसरा क्रमांक जापान आणि चौथ्या क्रमांकावर ब्रिटेन आहे. भारताच्या 400 पेक्षा जास्त कंपन्या स्पेस टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. ज्या वेगाने भारतात स्टार्ट अप्स सुरू होत आहेत त्यावरून असा अंदाज बांधला जात आहे भारत लवकरच अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असेल.

देशाच्या सगळ्याच चंद्रमोहिमांचे नेतृत्व इस्त्रोने केले आहे. मात्र, या मोहिमांसाठी आवश्यक उपकरणांच्या पुरवठ्यात खासगी क्षेत्राचे मोठे योगदान राहिले आहे. भारतीय अंतरिक्ष महासंघाचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल अनिलकुमार भट्ट यांनी बिजनेस टुडेला सांगितले की पुरवठादारांना ओळखण्याचे श्रेय इस्त्रोलाच द्यावे लागेल. चांद्रयान 3 मोहिमेत खासगी कंपन्यांचे योगदान आहे.

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्टचं का?

लार्सन अँड टुब्रो कंपनीने लाँच व्हेइकल बूस्टर सेगमेंट आणि सबसिस्टम तयार केले. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) बॅटीरीचा पुरवठा केला. केरळ राज्य इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने इलेक्ट्रॉनिक पॉवर मॉड्यूल परीक्षणाचे काम केले. या मोहिमांसाठी आवश्यक उपकरणांचे उत्पादन वालचंद इंडस्ट्रिज कंपनीने केले.

Anant Technologies LTD

या मोहिमेसाठी उपकरणे आणि अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि गोदरेज सारख्या दिग्गज कंपन्यांचीही नावे आहेत. एटीएलने लाँच व्हेईकल, सॅटेलाइट, अंतराळ यान पेलोड आणि ग्राउंड सिस्टमसाठी विविध इलेक्ट्रॉनिक्स साहित्यासह यांत्रिक उपप्रणालीची निर्मितीत मदत केली.

Godrej Aerospace

यानाचे रॉकेट इंजिन आणि थ्रस्टर सारखे आवश्यक साहित्य गोदरेज एयरोस्पेस कंपनीने पुरवठा केले. चंद्रयानाचे विकास इंजिन, सॅटेलाइडट थ्रस्टर्सचे उत्पादन गोदरेज कंपनीच्या मुंबईतील विक्रोळी फॅसिलिटी येथे करण्यात आले.

Chandrayaan 3 : आज चंद्रावर उतरणार चंद्रयान; रशियाचं मिशन फेल गेल्यानंतर इस्त्रोने घेतला ‘हा’ निर्णय

Tata Steel

टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टीलनेही चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणात महत्वाचे योगदान दिले. या कंपनीने तयार केलेली क्रेनने लाँच व्हेईकलला असेंबल करण्यात मदत केली. या क्रेनची निर्मिती जमशेजपूर येथील कार्यशाळेत करण्यात आली.

Himson Industrial Ceramic

सूरत येथील कंपनी Himson Industrial Ceramic ने चंद्रयानाच्या उपकरणांचे कमाल तापमानापासून संरक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण उपकरणांचा पुरवठा केला. ही कंपनी मागील तीस वर्षांपासून इस्त्रोबरोबर काम करत आहे. कंपनीने तयार केलेले Squibs 3000 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही यान आणि त्यातील उपकरणाांचे संरक्षण करील.

Tags

follow us