तीन दिवसांवर लग्न अन् तरुणाचं टोकाच पाऊल, धमक्या देणाऱ्या लोकांची नाव उघड

या धमकीच्या प्रकारानंतर कुटुंबीयांचा आरोप आहे की सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे श्रीकांतने आपले आयुष्य संपवले.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 21T172120.652

एक घटना समोर आली आहे. लग्नाला फक्त तीन दिवस बाकी असताना एका तरुणाने (Crime) आत्महत्या केली. त्याला सतत धमक्यांचे फोन येऊ लागले होते. त्या फोनमुळे तरुण खचला होता. यातून मार्ग काढण्यासाठी त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने विष प्राशन करून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना हैदराबादच्या वनस्थलीपुरममध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण परांडा श्रीकांत (वय 32) साहेबनगर येथे राहत होता. तो रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित काम करत होता. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याने हैदराबादच्या हयातनगर परिसरातील चार व्यक्तींकडून सुमारे 2 लाख रुपये उसने घेतले होते. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने तो ही रक्कम वेळेवर परत करू शकला नव्हता.

धक्कादायक घटना! तरुणीला धमकावत ठेवले संबंध, गर्भ राहिल्यानंतर तरुणीची पोलिसांत धाव

श्रीकांतचं 23 नोव्हेंबरला लग्न ठरले होतं आणि घरी लग्नाच्या जोरदार तयारी सुरू होती. त्याने होणाऱ्या बायकोला देखील सोन्याचे दागिणे, नव्या लग्नासाठी लागणाऱ्या साड्या घेतल्या होत्या. आरोप आहे की कर्ज देणाऱ्या चौघांनी दबाव वाढवण्यासाठी श्रीकांतला सतत फोन करून धमकावण्यास सुरुवात केली. ते त्याला म्हणत असत की पैसे परत नाही केले तर त्याचे लग्न थांबवतील म्हणून. या धमक्यांमुळे श्रीकांत मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता.

या प्रकारानंतर कुटुंबीयांचा आरोप आहे की सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे श्रीकांतने आपले आयुष्य संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ नोट रेकॉर्ड केला, ज्यात त्याने त्या चार व्यक्तींची नावे स्पष्टपणे सांगितली – सत्यनारायण, सुभ्बाराव, अप्पम शेखर आणि ऐतगोनी शेखर. व्हिडीओत त्याने विनंती केली की आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या लोकांना सोडू नये. हा व्हिडीओ त्याने आपल्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही पाठवला होता.

गुरुवारी २० नोव्हेंबरला सकाळी जेव्हा कुटुंबीयांना श्रीकांत दिसला नाही, तेव्हा त्यांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली आणि अखेर हरीहरपुरम चेरुवू कुट्टाजवळ श्रीकांत मृतावस्थेत आढळला. पोलिसांना कळवण्यात आले आणि ते घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समजले की त्याने कीटकनाशक विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतकाजवळ सापडलेल्या व्हिडीओ आणि सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी सांगितलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

follow us