मोठी बातमी! पोलिसांकडून तब्बल12 हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त, राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचं हैदराबाद कनेक्शन उघड

Mira Bhayandar Police drug raid

Mira Bhayandar Police drug raid : मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना या प्रकरणातील हैदराबाद कनेक्शन आता उघडकीस आलंय. मीरा-भाईंदर पोलिसांनी हैदराबादमध्ये या प्रकरणात राज्यातील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 12 हजार कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तेलंगणातील चेरापल्ली येथे ही गुप्त फॅक्टरी चालवली जात होती. मीरा-भाईंदर पोलिसांकडून या फॅक्टरीवर छापा टाकून 32 हजार लिटर कच्चे ड्रग्ज (रॉ मटेरियल) जप्त करण्यात आले.

लाडक्या बाप्पाला निरोप : ग्रामदैवत, मानाच्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पोलिसांकडून (Mira Bhayandar Police) करण्यात आलेल्या या कारवाईत (Drugs) एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अटक करण्यात आलेल्यांमध्ये फॅक्टरीचा मालक, एक केमिकल ॲनालायझर आणि एक विदेशी नागरिक यांचा समावेश आहे.

धक्कादायक! लालबागच्या राजाच्या गेटजवळ भीषण अपघात, दोन चिमुकल्यांना चिरडले; एकाचा मृत्यू

सुरुवात केवळ 200 ग्रॅम ड्रग्जच्या प्रकरणापासून

मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या (Drugs) या प्रकरणातील कारवाईची सुरुवात केवळ 200 ग्रॅम ड्रग्ज पकडल्यानंतर झाली होती. त्यावरून सुरू झालेल्या तपासाचा धागा पकडत पोलिसांनी (Mira Bhayandar Police) चौकशीचा विस्तार केला. त्यानंतर या प्रकरणाचे हैदराबाद कनेक्शन उघडकीस आले. त्यानंतर त्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने 14 पोलिसांसोबत घेऊन हैदराबाद (Hyderabad) येथे छापेमारी केली. या प्रकरणात (Drugs) सर्वांत मोठी कारवाई करत अखेर 25 लाखांच्या मालापासून तब्बल 12 हजार कोटींपर्यंतच्या अमली पदार्थांच्या जाळ्याचा पोलिसांनी (Mira Bhayandar Police) पर्दाफाश केला.

आधी टॅरिफ कार्ड आता मैत्रीचा डाव! “मोदी अन् मी नेहमीच मित्र”, ट्रम्प यांच्या मेसेजला मोदींचा खास रिप्लाय..

काय म्हणाले मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त?

मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक (Mira Bhayandar Police) म्हणाले की, “क्राइम ब्रांच युनिट फोरच्या टीमने एक महिन्यापूर्वी पेडलर्सला (Drugs) अटक केले होते. यानंतर तपासाला सुरुवात झाली आणि आम्ही तेलंगणातील (Hyderabad) कारखान्यापर्यंत पोहोचलो. 25 ग्रॅमपासून ते 32000 लिटर पर्यंत पोहोचत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत क्राईम ब्रँच युनिटने काम केले आहे. एक महिन्याचा सतत मेहनतीनंतर पोलिसांना यश मिळाले आहे. आतापर्यंत या प्रकरणात (Drugs) 12 आरोपींना अटक केली आहे. फॅक्टरीच्या मालकाला ताब्यात घेतलेले आहे. केमिकल ॲनालायझरला ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कारवाईचे कौतुक केल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक (Mira Bhayandar Police) यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube