Download App

Chandrayaan 3 : आज चंद्रावर उतरणार चंद्रयान; रशियाचं मिशन फेल गेल्यानंतर इस्त्रोने घेतला ‘हा’ निर्णय

Chandrayaan 3 : भारताच्या चंद्र मोहिमेसाठी (Moon Mission) आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. आज सायंकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान चंद्रयान 3 (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. जर ही किमया साधली गेली तर चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश बनेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश ठरेल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला या क्षणाची उत्सुकता लागून राहिलेली आहे.

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्टचं का?

इस्त्रोने या मोहिमेची तयारी पूर्ण केली आहे. शास्त्रज्ञांच्या पथकाने सॉफ्ट लँडिंग दरम्यान लास्ट मिनिट ऑफ टेररचा धोकाही संपवला आहे. चंद्रयान 3 अंतराळात चाळीस हजार किलोमीटर प्रतितास या वेगाने चाललं आहे. मात्र, रशियाचे मिशन अपयशी ठरल्यानंतर भारताने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या यानाची लँडिंग कासवाच्या गतीने ठेवण्यात येणार आहे.

कासवाच्या चालीपेक्षाही कमी वेगान यान चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कासव सरासरी 4 ते 5 सेकंद प्रति सेकंदाने तरंगतात. तर 1 ते 2 मीटर प्रति सेकंदाच्या गतीने जमिनीवर चालतात. कासवांची पिल्ले 30 तासाच फक्त 40 किलोमीटर अंतर पार करू शकतात. मादी कासव तिची पिल्ले किंवा नर कासवांपेक्षाही आधिक वेगात पाण्यात तरंगतात. त्याचप्रमाणे आता चंद्रयान 3 ची लँडिंग 1 ते 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने होणार आहे.

‘स्वागत आहे भावा!’ चंद्राजवळच ‘चंद्रयान 3’ ला भेटलं ‘चंद्रयान 2’

अतिघाई संकटात नेई, रशियाच्या लूना 25 बाबतीत हेच घडलं

रशियाच्या लूना 25 यानाची चंद्रावर उतरण्याची गती जास्त होती. लवकर पोहोचण्याच्या घाईत यान कोसळलं. रशियाच्या अंतराळ संस्थेनेही ही चूक मान्य केली आहे. लूना 25 त्याला ठरवून दिलेल्या वेगापेक्षा दीड पट वेगाने गेले. त्याचा परिणाम असा झाला की हे यान चंद्रावर उतरण्याऐवजी क्रॅश झालं. रशियाच्या या चुकीतून भारताने मात्र शहाणपण घेतले आहे. शेवटच्या टप्प्यात काहीही गडबड होऊ नये यासाठी शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत.

चंद्राच्या प्रवासात घडली बंधूभेट

भारताने याआधी चंद्रयान 2 चंद्रावर रवाना केले होते. परंतु, ऐनवेळी या यानाच्या प्रक्रियेत तांत्रिक बिघाड झाला. चंद्रयान 2 काही चंद्रावर पोहोचू शकले नाही. त्यानंतर आता भारताने मागील चुका टाळून चंद्रयान 3 मोहिम आखली आहे. आता हे चंद्रयान चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. भारताच्या या मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असतानाच एक अनोखी घटना घडली आहे. चंद्रयान 2 (Chandrayaan 2) आणि चंद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूलमध्ये संपर्क प्रस्थापित झाला आहे. चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरनेही वेलकम बडी (स्वागत आहे भावा!) असे म्हणत चंद्रयान 3 लँडर मॉड्युलचे स्वागत केले आहे.

Tags

follow us