Download App

विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! भल्या पहाटेच चंद्रावर मारली चक्कर; पहिला फोटो आला समोर

Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयानाने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाचे जगभरातून कौतुक होत आहे. यानंतर आता विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आहे. त्यानंतर प्रज्ञानने चंद्राच्या जमिनीवर फेरफटका मारला, अशी माहिती देणारे ट्विट इस्त्रोने केले आहे.

चांद्रयानाचे दोन महत्वाचे भाग आहेत. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर. काल सायंकाळी विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर आता या लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आहे. रोव्हर सहा चाकी रोबोटिक वाहन आहे. जे चंद्राच्या जमिनीवर फिरणार आहे. येथील जमिनीचे फोटो काढणार आहे.

आता चंद्रावर पुढं काय घडणार ?

विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर चार तासांनी प्रज्ञान रोव्हर बाहेर आले. या रोव्हरचा वेग प्रति सेकंद एक सेंटीमीटर असा राहिल. कॅमेऱ्यांच्या मदतीने चंद्रावरील गोष्टींचे रोव्हरवर स्कॅनिंग केले जाईल. हा रोव्हर चंद्रावरील हवामानाचीही माहिती देणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या आयन आणि इलेक्ट्रॉनचे प्रमाणही शोधणार आहे.

शास्त्रज्ञांच्या माहितीनूसार, चांद्रयान – 3 चं मिशन तीन भागांत विभागून देणार आहेत. प्रोप्लेशन मॉड्युल आधी लॅंडरला चंद्राच्या कक्षेत घेऊन गेला, त्यानंतर विक्रम वेगळा होणार आहे. त्यावेळी प्रोप्लेशन मॉड्युल चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. याचदरम्यान विक्रम लँडरसोबत रोवर प्रज्ञानला पाठवण्यात येणार आहे.

Chandrayaan 3 : भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल; आता ‘मिशन चांद्रयान’मध्ये पुढं काय?

चंद्राचा भाग पर्यावरण आणि त्याच्यात येणाऱ्या अडचणींमुळे अतिशय वेगळा प्रदेश आहे, त्यामुळे त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. चंद्रावर पोहोचलेली सगळी यान भूमध्यरेखीय क्षेत्रात उतरली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागाचंही संशोधन सुरू आहे. चंद्रावर पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सिलीकॉन, एल्युमिनियम, टायटेनियम आणि आयर्न उपलब्ध आहे का? हेही रोवर प्रज्ञान तपासणार आहे.

Tags

follow us