Chandrayaan 3 : भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल; आता ‘मिशन चांद्रयान’मध्ये पुढं काय?
चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान -3 चं सॉफ्ट लॅंडिंग झालं आहे. चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर लॅंडिग झाल्यानंतर चंद्रावरील काही फोटोही मिशन कंट्रोलला प्राप्त झाले असून आता पुढे चांद्रयानाची मोहिम कशी असणार आहे? चंद्रावर हे चांद्रयान काय शोधणार? याबद्दल सविस्तरपणे पाहुयात..
Chandrayaan 3 Landing : मोहिम फत्ते! ‘आता चंद्रावरील दक्षिण ध्रुव आमचाच’; जगाचा भारताला सलाम…
‘मिशन चांद्रयाना’च्या पहिल्या टप्पात हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडिंग झालं आहे. त्यानंतर आता चांद्रयानाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. चांद्रयान मोहिमेत विक्रम लॅंड झाल्यानंतर वेगवेगळी कामं सुरु करणार आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनूसार, चांद्रयान – 3 चं मिशन तीन भागांत विभागून देणार आहेत. प्रोप्लेशन मॉड्युल आधी लॅंडरला चंद्राच्या कक्षेत घेऊन गेला, त्यानंतर विक्रम वेगळा होणार आहे. त्यावेळी प्रोप्लेशन मॉड्युल चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. याचदरम्यान विक्रम लॅंडरसोबत रोवर प्रज्ञानला पाठवण्यात येणार आहे.
Ravi Jadhav: रवी जाधव यांची हेमांगी कवीसाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘छोटेशी व्यक्तीरेखा…’
आत्ता सध्या लँडर विक्रमने चंद्रावर यशस्वीरित्या उतरून पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्यानंतर आता रोवर वेगळा होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. यावेळी रोवर वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती, फोटो, विविध डेटा, मिशन कंट्रोलला पाठवणार आहे. रोवर प्रज्ञान अनेक प्रकारची माहिती आणि शक्यता तपासून बघणार आहे. चंद्रावरील माती, जमिनी, तत्व, खनिज तत्व, विशेष म्हणजे पाणी आहे की नाही? याची चाचणी रोवर प्रज्ञान करणार आहे.
Box Office Collection:’जेलर’ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; कोण हिट कोण फ्लॉप..? जाणून घ्या…
चंद्राचा भाग पर्यावरण आणि त्याच्यात येणाऱ्या अडचणींमुळे अतिशय वेगळा प्रदेश आहे, त्यामुळे त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. चंद्रावर पोहोचलेली सगळी यान भूमध्यरेखीय क्षेत्रात उतरली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागाचंही संशोधन सुरू आहे. चंद्रावर पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सिलीकॉन, एल्युमिनियम, टायटेनियम आणि आयर्न उपलब्ध आहे का? हेही रोवर प्रज्ञान तपासणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोट्यवधी वर्षांपासून अंधारात आहेत. सूर्याचा प्रकाशही या भागात कधी पोहोचू शकला नाही, त्यामुळे या भागाची माहिती रोवरकडून मिळू शकते. रोवर दक्षिण ध्रुवावर अंतराळ विज्ञानाशी निगडित असलेलं संशोधन करण्यात येणार आहे.