आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो! मोदी शाहंच्या फोटोखाली वादग्रस्त मजकूर, प्रकरण काय?
IIT Bombay Poster कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या फोटोखाली वादग्रस्त मजकूर छापल्याचं समोर आलं आहे.

IIT Bombay Poster Controversial Content on Modi Shah photo at America Program : देशाच्या आणि राज्याचे राजकारणामध्ये सत्ताधारी भाजपवर विरोधकांकडून विविध आरोप आणि टीकाटिप्पणी केली जाते. मात्र आता थेट अमेरिकेमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये देखील पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या फोटोखाली वादग्रस्त मजकूर छापल्याचं समोर आलं आहे. त्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमेरिकेमधील बर्कले विद्यापीठामध्ये दक्षिण आशियाई भांडवलशाही कार्यशाळेचा आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी एक पत्रक छापण्यात आली होती. या पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो छापण्यात आले होते. या फोटो खाली वादग्रस्त मजकूर छापण्यात आल्याने वाद पेटला आहे.
जामिनाला आकारण उशीर हा अन्याय… 2 महिन्यांत निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कार्यक्रमांमध्ये आयोजक म्हणून आयआयटी मुंबई देखील सहभागी होते. मात्र या वादग्रस्त पोस्टरनंतर आयआयटी मुंबईने या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. तसेच या पत्रकारवरून समाज माध्यमातून टीकेचा भडीमार झाल्यानंतर ही पत्रकं सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आली आहेत. हर्षिल मेहता यांनी हे पत्र सर्वांच्या लक्षात आणून दिलं होतं.
ट्रम्प यांच्या वक्तव्याला मोदींचा सकारात्मक प्रतिसाद
टॅरिफच्या (US Tariff) मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावत आहेत. या दरम्यान मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाल्याचं समोर आलं आहे. कारण नुकतच ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले मी देखील ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे.