Chandrayaan 3 : रशियाचे लूना 25 (Luna 25) चंद्रावरच कोसळल्याने चंद्रावर जाण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं. मात्र, भारताचे चंद्रयान (Chandrayaan 3) मात्र चंद्रावर उतरण्याच्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. उद्या सायंकळी यान चंद्रावर उतरेल असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सगळी व्यवस्था केली जात आहे. भारताच्या या मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असतानाच एक अनोखी घटना घडली आहे. चंद्रयान 2 (Chandrayaan 2) आणि चंद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूलमध्ये संपर्क प्रस्थापित झाला आहे. चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरनेही वेलकम बडी (स्वागत आहे भावा!) असे म्हणत चंद्रयान 3 लँडर मॉड्युलचे स्वागत केले आहे.
ठरलं तर! बुधवारी ‘या’ वेळेला चंद्रावर उतरणार चांद्रयान; ISRO ने केलं कन्फर्म
भारताने याआधी चंद्रयान 2 चंद्रावर रवाना केले होते. परंतु, ऐनवेळी या यानाच्या प्रक्रियेत तांत्रिक बिघाड झाला. चंद्रयान 2 काही चंद्रावर पोहोचू शकले नाही. त्यानंतर आता भारताने मागील चुका टाळून चंद्रयान 3 मोहिम आखली आहे. आता हे चंद्रयान चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे.
ऑर्बिटर, लँडर, रोव्हर यांचा समावेश असलेले चंद्रयान 2 सन 2019 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्रावर उतरण्यात मात्र यश मिळाले नाही. अचूक प्रक्षेपण आणि कक्षा बदलांमुळे ऑर्बिटरचे आयुष्य सात वर्षांपर्यंत वाढल्याच इस्त्रोने त्यावेळी जाहीर केले होते.
चंद्रयानाचे थेट प्रक्षेपण पाहण्याचीही सुविधा इस्त्रोने उपलब्ध करून दिली आहे. चंद्रयान 3 चे बुधवारी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर लँडिंग होणार आहे. इस्त्रोच्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवरूवन तुम्ही चंद्रयानाचे लँडिंग पाहू शकता. www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html या लिंकवरून तुम्ही पाहू शकता.
टोमॅटोने पोळलेल्या सरकारचा कांद्यावर आघात! चाळीस टक्के निर्यात शुल्क
याआधीच्या मोहिमेत (Chandrayaan 2) याच इंजिनने गडबड केली होती. त्यातच चंद्रावर उतरताना उंचीचा अंदाजही चुकला होता. त्यामुळे चांद्रयान 2 अलगद न उतरता वेगाने आदळले होते. त्यामुळे भारताची ही मोहिम अयशस्वी ठरली होती. त्यामुळे मागच्या मोहिमेतील या चुका टाळून आता चांद्रयान 3 चंद्रावर अलगद उतरविण्याची किमया साध्य करावी लागणार आहे.
यापूर्वी ISRO ने 22 जुलै 2019 रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-2 प्रक्षेपित केले होते. 6 सप्टेंबर 2019 रोजी ते सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चंद्रावर उतरण्याच्या तीन मिनिटे आधी इस्रोचा विक्रमशी संपर्क तुटला होता. आता मात्र तशी परिस्थिती परत उद्भवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.