Download App

Samudrayaan Mission : चांद्रयान-3 नंतर समुद्रयान मोहीम! समुद्राचा तळ गाठणार ‘मत्स्य 6000’

Samudrayaan Mission : चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर भारत आता सागर मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्त्रोने अंतराळाचा मोहीम फत्ते केल्यानंतर भारत समुद्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या मदतीने मानवाला समुद्रात 6 हजार मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरु आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागर संपत्तीची पाहणी करण्याची संधी मिळणार असून सागरी पर्यटनाला देखील चालना मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे.

…तर संभाजी भिडेंच्या कृत्याचं खापर देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला जाईल, जयंत पाटलांचा टोला

मंत्री रिजिजू यांनी मत्स्य 6000 सबमर्सिबलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मत्स्य 6000 सबमर्सिबलमध्ये समुद्रात तीन माणसांना घेऊन सहा हजार मीटरपर्यंत खाली जाण्याची क्षमता आहे. या सबमर्सिबलची निर्मिती चेन्नईमधील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने (National Institute of Ocean Technology -NIOT) यांनी केली आहे.

या मोहिमेला समुद्रयान मिशन असे नाव देण्यात आले आहे. सबमर्सिबलमध्ये लोकांना खोल समुद्रात नेण्याच्या तपासणीचे काम 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. सबमर्सिबलमुळे समुद्राच्या कोणत्याही परिसंस्थेला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार 2024 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये मत्स्य 6000 ची चाचणी घेतली जाणार आहे.

Selling Scrap : रद्दी, भंगार विकून केंद्र सरकार मालामाल, कमावले 600 कोटी

मत्स्य 6000 हे समुद्रयान गोलाकार असून त्याचा व्यास 2.1 मीटर आहे. 80 एमएमच्या जाड थर असलेल्या टायटॅनियम मिश्र धातूपासून ही सबमर्सिबल बनवण्यात आली आहे. समुद्राच्या आत 6000 मीटर खोलीवर ती 600 पटींनी अधिक दबाव सहन करु शकणार आहे.

मत्स्य 6000 हे यान सलग 12 ते 16 तास पाण्यात प्रवास, काम करु शकते. त्यात 96 तास पुरेल एवढा ऑक्सीजन देण्यात आला आहे. मत्स्य 6000 या समुद्रयान प्रकल्पांतर्गत समुद्रात खोल असलेल्या संसाधनांचा शोध घेता येणार आहे. या मोहिमेतून समुद्राच्या खोल भागात कोबाल्ट, तांबे व मँगनीज आदी खनिजांचा शोध घेतला जाणार आहे. त्याचबरोबर समुद्रातील जैवविविधतेचाही अभ्यास केला जाणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने महासागर मोहिमेसाठी चार हजार 77 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. समुद्रयान प्रकल्प हा याच मोहिमेचा एक भाग आहे.

Tags

follow us