…तर संभाजी भिडेंच्या कृत्याचं खापर देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला जाईल, जयंत पाटलांचा टोला

Jayat Patil on Devendra Fadnavis : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीसांच्या वतीने गेले असतील तर त्यांनी केलेल्या कृत्याचं खापरं फडणवीसांच्या वाट्याला जाईल, असे म्हटले […]

Jayat Patil

Jayat Patil

Jayat Patil on Devendra Fadnavis : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीसांच्या वतीने गेले असतील तर त्यांनी केलेल्या कृत्याचं खापरं फडणवीसांच्या वाट्याला जाईल, असे म्हटले आहे.

संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी केलेली विधानं ही अतिशय आक्षेपार्ह आहेत. ज्या ठिकाणी सगळ्या मीडियाचे लक्ष केंद्रित असते त्या ठिकाणी जाऊन संभाजी भिडेंनी काही भूमिका मांडली. मला अपेक्षा आहे की, ते तिथे देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने गेले नसावेत. पण जर गेले असतील तर संभाजी भिडे यांनी केलेल्या कृत्याचं खापरं देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला जातील, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Selling Scrap : रद्दी, भंगार विकून केंद्र सरकार मालामाल, कमावले 600 कोटी

त्यामुळे आपेक्षा आहे की ते स्वत:च तिथे गेले असतील. यावर देवेंद्र फडणवीसांनी योग्य स्पष्टीकरण दिले पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी लागवला.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचाऱ्यांच्या पगारात खासगी कंपनीचे तीन तीन कर्मचारी काम करु शकतात, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यावरुन जयंत पाटील जोरदार टीका केली आहे.

मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा

सरकारचं आपण कॉन्ट्रेक्टवर दिलं पाहिजे. त्यामुळे आपला खर्च वाचवता येईल. सरकारी कर्मचारी घरी पाठवू आणि सरकार कॉन्ट्रेक्टवर चालवायला देऊ. म्हणजे उरलेले पैसे विकासावर खर्च करता येतील, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लागवला.

Exit mobile version