14 Trains Cancelled : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यता आली. तर आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत (Mumbai) अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या 14 गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
या गाड्यांमध्ये पुणे, जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने (Central Railway) दिली आहे. सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) , इंद्रायणी एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी या गाड्यांचा समावेश आहे.
पावसामुळे रद्द झालेल्या गाड्या
Deccan Express CSMT (मुंबई) → पुणे
Deccan Express पुणे → CSMT (मुंबई)
Indrayani Express CSMT (मुंबई) → पुणे
Indrayani Express पुणे → CSMT (मुंबई)
Jhelum Express (short distance cancelled segment) पुणे → CSMT (मुंबई)
Jalna – Mumbai CSMT Jan Shatabdi Express जालना → CSMT (मुंबई)
Dhule – Mumbai CSMT Express धुळे → CSMT (मुंबई)
⚠️ #CRRailUpdates
Heavy rains over Mumbai & Suburban areas 🌧️🚆Due to waterlogging on tracks, several Mail/Express trains have been rescheduled, cancelled, or diverted.
Passengers are advised to check the latest updates before travel. #MumbaiRains pic.twitter.com/yvUYHQKBBc
— Central Railway (@Central_Railway) August 19, 2025
राहुल गांधी माफी मागणार का? संजय कुमार यांच्या माफीनंतर CM फडणवीसांचा पलटवार
Mumbai CSMT – Dhule Express CSMT (मुंबई) → धुळे