Chandrayan 3 Google Doodle : भारताचं चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayan 3) 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड करण्यात आले. त्यानंतर असंख्य भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली त्याचा आनंद सर्वत्र पाहायला मिळाला. तेसच जगभरातून भारताच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात गुगलने (Google Doodle ) देखील या चांद्रयान 3 च्या यशाचा आनंद साजरा केला. आपल्या खास स्टाईलमध्ये गुगलने भारताचं यश साजरं केलं आहे.
‘भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहुला मी..,’ काँग्रेस आमदाराचा खुलासा…
खास स्टाईलमध्ये गुगलने साजरं केलं भारताचं यश…
सर्च इंजिन गुगलने ही भारताला चांद्रयान-3 (Chandrayan 3) मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी गुगलने खास गुगल डुडल बनवत भारताच्या चंद्रमोहिमेचं कौतुक केलं आहे. गुगलने बनवलेल्या डुडलमध्ये (Google Doodle) चंद्राच्या भोवती चांद्रयान-३ प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. चंद्राच्या भोवती फिरल्यानंतर चांद्रयान चंद्राच्या कायम अंधारात असलेल्या दक्षिण ध्रुवावर उतरतं आणि त्यातून मग रोव्हर बाहेर येतो, असं संपूण ॲनिमेशनच्या रुपातील डुडल साकारतं गुगलने भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक केलं आहे. गुगलकडून खास दिवस, कार्यक्रम, मोहिम किंवा उपक्रम तसेच उल्लेखनीय ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मरणार्थ डुडल साकारलं जातं.
http://www.google.com/doodles/celebrating-the-first-landing-on-the-moons-south-pole
सौदी अरेबियासह 6 राष्ट्रांचा BRICS मध्ये समावेश, विस्तारासोबत ‘हे’ नामकरणही झालं
त्याचबरोबर बुधवारी जेव्हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayan 3) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड करण्यात आले. त्यावेळी भारतीय वंशाचे असणारे गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी देखील भारताच्या या मोहिमेच्या यशाचा आनंद व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी लगेचच गुगलने डूडल बनवले नव्हते. तेव्हा त्याची चर्चा झाली होती की, गुगलने भारताच्या या यशाचं डूडल बनवलं नाही. मात्र त्यानंतर आज आपल्या खास स्टाईलमध्ये गुगलने भारताचं यश साजरं केलं आहे.
86 लाख यूजर्सने अनुभवला चांद्रयान-3 चा ऐतिहासिक क्षण…
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) काल (दि. 23) आणखी एक इतिहास रचला आहे.
इस्त्रोच्या चांद्रयान 3 (Chandrayan 3) चे लाईव्ह स्ट्रीमिंगने यूट्यूवर तब्बल 8.06 दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. ही आकडेवारी एखाद्या लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान पाहण्यात आलेली यूट्यूबच्या इतिहासातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. यामुळे आतापर्यंतच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या आकडेवारीत इस्त्रोने बाजी मारत यूट्यूबवरील सर्व रोकॉर्ड मोडले आहेत. आतापर्यंत यूट्यूबवर ब्राझील वि. कोरियाच्या फुटबॉल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाचवेळी 6.15 दशलक्ष लोकांनी पाहिले होते. परंतु, बुधवारी इस्त्रोने त्यांच्या अधिकृत साईटवरून चांद्रयान 3 चे लाईव्ह स्ट्रीमिंग करत ही आकडेवारी मोडीत काढली आहे.