Download App

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत दंगल

  • Written By: Last Updated:

हावडा : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती होती. काल अचानक संभाजीनगरमधील किराडपूर भागात दोन गटात मोठा राडा झाला. अशातच आता पश्चिम बंगालच्या हावडा (Howrah) येथंही आज रामनवमीच्या उत्सवादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक वाहने जाळण्यात आली, दगडफेक करण्यात आली आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असून परिसरात दंगल नियंत्रण दलासह – प्रचंड पोलिस फौज तैनात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जात आहे. कोलकत्यातही रामनवमी मिरवणूक काढण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाशी निगडीत असलेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून ही रामनवमीची मिरवणूक काढण्यात आली होती. ही रामनवमीची मिरवणूक ही सायंकाळी काझीपारा परिसरातून जात असताना ही हिंसाचाराची घटना घडली. या मिरवणूकीवर काही समाजकंटकांकडून दगड फेक करण्यात आली. या घटनेत वाहनांची देखील जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात काही पोलिसांच्या वाहनांसह अनेक गाड्यांचे नुकसान झाले आणि जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा कर्मचार्‍यांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

Ajit Pawar यांची केंद्रांवर टीका : मूठभर उद्योगपतींचे ११ लाख कोटी माफ केले… पण शेतकऱ्यांना मदत नाही केली!

दंगलीच्या या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचे वातारवण आहे. सध्या या परिसरात कोणतीही जीवीत हानी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ज्या केंद्राच्या धोरणांच्या विरोधात कोलकाता येथे दोन दिवसांच्या उपोषणावर आहेत, त्यांनी दंगलखोरांना देशाचे शत्रू म्हटले आणि आजच्या हिंसाचारामागे असलेल्यांना माफ केले जाणार नाही असा इशारा दिला.

ममता बॅनर्जी यांनी आधीच सावधानतेचा इशारा दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की, सध्या रमजानचा महिना सुरू आहे, त्यामुळं रॅली काढतांना कुठलाही हिंसाचार होणार नाही, याची खबरदारी घेण्यात अशा सुचना दिल्या होत्या. दरम्यान, आता त्यांनी सांगिलतं की, माझे डोळे आणि कान उघडे आहेत. मी सर्वकाही बघू शकते. या दंगलीत ज्यांचा सहभाग आहे, त्यांना मी सोडणार नाही.

त्या म्हणाल्या की, आजच्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. मी दंगलखोरांना पाठिंबा देत नाही आणि त्यांना देशाचेही शत्रू मानत नाही. भाजपने नेहमीच हावड्याला लक्ष्य केले आहे. त्यांच्यासाठी पुढील लक्ष्य पार्क, सर्कस आणि इस्लामपूर आहेत. त्यामुळं प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे, असा सावधानतेचा इशारा दिला.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी मात्र ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले असून त्यांना हिंसाचारासाठी तृणमूल सरकारलाच जबाबदार धरले. या हिंसाचाराला मुख्यमंत्री आणि राज्य प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत ते म्हणाले की, जे लोक सनातन संस्कृती”मानतात ते राम जयंती साजरी करतील. त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्याऐवजी ममता बॅनर्जी यांनी बनावट आणि खोटे दावे करून निषेध जाहीर केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Tags

follow us