Chhattisgarh News : छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. यांसह देशातील आणखी काही राज्यांत नक्षलवाद्यांचं नेटवर्क आहे. हे नेटवर्क उद्धवस्त करून देश नक्षलमुक्त करण्याचं उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवलं आहे. या दिशेने काम करत असताना केंद्र सरकारला मोठं यश मिळालं आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा नक्षलवाद मुक्त झाला आहे. लेफ्ट विंग इक्स्ट्रिमिझम (LWF) यादीतून बस्तर जिल्ह्याचं नाव हटवण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता अधिकृतपणे बस्तर जिल्हा नक्षलवाद मुक्त घोषित करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्य आणि वर्षानुवर्षे नक्षल्यांचा उत्पात सहन करणाऱ्या बस्तरसाठी ही घटना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
मागील काही वर्षांत सुरक्षा दल, राज्य सरकार आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बस्तरमध्ये शांतता नांदू लागली आहे. या ठिकाणी सरकारने विकासकामांचा वेग वाढवला होता. रस्ते निर्माण, शिक्षण, आरोग्य सेवांची उपलब्धता तसेच प्रशासनाची गतिमानता या काही गोष्टींमुळे बस्तरमधून नक्षलवाद्यांचं उच्चाटन होण्यास मदत झाली.
‘त्या’ नोटांच्या ढिगाबाबत जस्टिस वर्मांकडे स्पष्टीकरण नाहीच; आता महाभियोग चालवला जाणार
केंद्र सरकारने बस्तरचे नाव LWE यादीतून हटवण्याच्या निर्णयानंतर जिल्ह्याचा विकास आणखी वेगाने असा दावा करण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्याची नक्षलग्रस्त ही प्रतिमा पूर्णपणे बदलेल. तसेच या ठिकाणी रोजगारात वाढ होईल. पर्यटनाला चालना मिळेल असेही सांगण्यात आले. बस्तरवासियांसाठी हा अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे. आगामी काळात या जिल्ह्यात शांतता आणि विकासाच्या दिशेने वेगाने पावले पडतील.
बस्तर जिल्हा मागील अनेक वर्षांपासून नक्षलवादात होरपळून निघत होता. 1980 च्या दशकात येथे नक्षलवादाला सुरुवात झाली होती. माओवादी विचारधारेने स्थानिक नागरिकांना प्रभावित केले. सरकारी धोरणे आणि विकासकामांच्या अभावाने लोक संतप्त होते. मागील काही वर्षांत नक्षल्यांनी सुरक्षा दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनावर सातत्याने हल्ले केले. सर्वसामान्य नागरिक देखील या हल्ल्यांत बळी पडले. नक्षलवाद नष्ट करण्यासाठी सरकारने सैन्य कारवाई आणि विकासकामे असा दुहेरी दृष्टीकोन अंगिकारला होता. नंतर जिल्ह्यातून हळूहळू नक्षलवादाचा प्रभाव कमी होत गेला.
मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितले होते की, पुढील चैत्र नवरात्रीपर्यंत लाल दहशतीचा शेवट झालेला असेल. या दरम्यान त्यांनी नक्षलींना शस्त्रे खाली ठेऊन विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचेही आवाहन केले होते. त्याचाही परिणाम दिसून आला.
‘त्या’ नोटांच्या ढिगाबाबत जस्टिस वर्मांकडे स्पष्टीकरण नाहीच; आता महाभियोग चालवला जाणार