Dantewada Naxalite Attack : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे 26 एप्रिल रोजी एक मोठा नक्षली हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये आपले 10 जवान शहीद झाले आहेत. यासह एका ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नक्षलवाद्यांनी IED ब्लास्ट करुन हा हल्ला केला आहे. माहितीनुसार, मागच्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांनी हा हल्ला करण्याची धमकी दिली होती. तसेच ज्या रस्त्यावरुन सैनिक गेले त्या रस्त्याला सॅनिटाइज का करण्यात आले नाही, असे प्रश्न देखील विचारले जात आहेत.
इंडियन एक्सप्रेसचे रिपोर्टर, महेंद्र सिंह मनराल यांच्या रिपोर्टनुसार, सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीजने 15 दिवस अगोदरच CRPF व स्थानिक पोलिसांना या हल्ल्याच्या बाबतीत इशारा दिला होता. इंटेलिजंसकडून असे इनपूट मिळाले होते की, दंतेवाडा, सुकमा व बीजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवादी IED हल्ल करण्याची योजना राबवत आहेत.
Delhi Excise Case : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, कोठडीतला मुक्काम वाढला
रिपोर्टनुसार, धमकीच्या पत्रात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दल स्थानिक लोकांसाठी समस्या निर्माण करत असल्याचे लिहिले होते. इतकेच नाही तर 25 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचाही नक्षलवाद्यांनी पत्रात उल्लेख केला होता. सीआरपीएफच्या 84 व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह जगदलपूरला आले होते.
ज्या मार्गावरून सुरक्षा दल गेले होते, त्या मार्गाची स्वच्छता का करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सहसा, सुरक्षा दलांच्या ताफ्यासमोर एक लहान चपळ पथक असते, जे मार्ग तपासते आणि ते स्वच्छ करते. मात्र दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यापूर्वी या मार्गाची चौकशी करण्यात आली नसल्याचे या घटनेची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नक्षलवादी हल्ला झालेल्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर ‘अमा पंडम’ नावाचा स्थानिक उत्सव साजरा केला जात होता. या कारणास्तव मार्गाचे स्वच्छता करण्यात आले नाही.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
रिपोर्टनुसार, सणानिमित्त त्या मार्गावर सुरक्षा दलांची वाहने मंदावली होती. अहवालानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी घटनास्थळाजवळ स्थानिक लोकांना उत्सव आयोजित करण्यास भाग पाडले असावे, जेणेकरून सुरक्षा दलांचा ताफा मंदावेल आणि नक्षलवादी त्यांच्यावर हल्ला करू शकतील.
सुरक्षा दलांच्या मार्गाची स्वच्छता करणारी टीम गेल्या काही महिन्यांपासून चारचाकी वाहनाचा वापर करत असल्याची माहितीही मिळाली आहे. पूर्वी पायी किंवा दुचाकीवरून मार्ग तपासण्यात येत असे. सूत्रांनी सांगितले की डीआरजीच्या नियमावलीत मार्ग स्वच्छ करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर करण्यास परवानगी नाही.
केंद्र सरकारची शेतकरी गटांसाठी मोठी योजना!