Download App

ईडी, सीबीआय येणार एकाच छताखाली! मोदी सरकार नवीन पद निर्माण करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : ईडी आणि सीबीआय या केंद्र सरकारच्या दोन्ही बहुचर्चित तपास यंत्रणा आता एकाच छताखाली येणार आहेत. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये समन्वयासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद निर्माण करण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर आता मोदी सरकार सीबीआय आणि ईडीमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर’ या पदाची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. (The post of ‘Chief Investigation Officer’ will be created to coordinate between CBI and ED)

संजय मिश्रा यांची नियुक्ती होणार?

दरम्यान, या पदाच्या निर्मितीनंतर तिथे ईडीचे विद्यमान संचालक संजय मिश्रा यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. मिश्रा यांना दोनवेळा दिलेल्या मुदतवाढीवरुन सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारले होते. त्यानंतर त्यांना येत्या 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर आता त्यांच्या निवृत्तीपूर्वीच ‘चीफ इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर’ हे पद निर्माण करून त्यांनाच या पदावर नियुक्त केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिझोरममध्ये मोठा अपघात! निर्माणाधिन रेल्वे पूल कोसळून 17 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

संजय मिश्रा मोदी सरकारसाठी एवढे महत्वाचे का?

संजय मिश्रा यांना यापूर्वी तीन वेळा दिलेली मुदतवाढ आणि त्यानंतर ‘चीफ इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर’ या पदावर केली जाणारी संभाव्य नियुक्ती यामुळे ते मोदी सरकारसाठी एवढे महत्वाचे का असा सवाल विचारला जात आहे. यामागे मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) या संघटनेच्या समितीच्या बैठकीसाठी संजय मिश्रा महत्वाचे असल्याचे सांगितले होते.

Chandrayan 3 Landing : सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण कसे, केव्हा आणि कोठे पाहता येणार?

एफएटीएफ काय आहे?

ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादीला होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे. यात भारतासह इतर 200 देशांचा समावेश आहे. पुनर्विलोकनानंतर, ही संस्था रेटिंग देते. एफएटीएफ पुनर्विलोकन आणि ईडी यांच्यात काय संबंध आहे? यावर मोदी सरकारकडून सांगण्यात आले की मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगचा थेट एफएटीएफ पुनर्विलोकनाशी संबंध आहे, भारतात ईडीच या दोन्ही प्रकरणांची चौकशी करते. सध्या एफएटीएफचा पीअर रिव्ह्यू सुरू आहे. यासाठी एफएटीएफ समिती 3 नोव्हेंबरला भारतात येणार आहे. मिश्रा हे मागील काही वर्षांपासून ईडीचे प्रमुख असल्याने एफएटीएफ समितीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मिश्रा यांची आवश्यकता असणार आहे. एफएटीएफ पुर्विलोकनाचा थेट देशाच्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम होतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेशी हे रेटिंग जोडलेले असते. त्यामुळे या रेटिंगला हलक्यात घेऊन चालणारे नसते.

Tags

follow us