मिझोरममध्ये मोठा अपघात! निर्माणाधिन रेल्वे पूल कोसळून 17 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

मिझोरममध्ये मोठा अपघात! निर्माणाधिन रेल्वे पूल कोसळून 17 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Accident News : मिझोराम राज्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मिझोराम येथील सैरांग परिसरात रेल्वे पूल बांधकाम सुरू आहे. हाच निर्माणाधीन पूल कोसळला. या दुर्घटनेत किमान 17 कामगारांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातानंतर घटनास्थळी अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आज सकाळी 10 वाजता ही दुर्घटना घडली त्यावेळी येथे 35 ते 40 कामगार उपस्थित होते. हे ठिकाणी मिझोरामची राजधानी आयजोलपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 17 मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. अन्य काही जण मात्र बेपत्ता आहेत. या बेपत्ता असणाऱ्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अपघात ठिकाणी सरकारी यंत्रणा दाखल झाल्या आहेत. मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

भारतात मुसळधार पाऊस, चांद्रयान 3 च्या लँडिंगवेळी कसं असणार चंद्रावर हवामान?

या घटनेनंतर परिसरात मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकले आहे का याचा शोध घेण्यात येत आहे. जखमी असतील तर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले जात आहे. याव्यतिरिक्त अन्य उपाययोजनाही या ठिकाणी केल्या जात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube