नवी दिल्ली : मनिष सिसोदिया निर्दोष असून त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण असल्याचं विधान राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. काल रात्री दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीसह देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
मनीष बेक़सूर हैं। उनकी गिरफ़्तारी गंदी राजनीति है। मनीष की गिरफ़्तारी से लोगों में बहुत रोष है। लोग सब देख रहे हैं। लोगों को सब समझ आ रहा है। लोग इसका जवाब देंगे।
इस से हमारे हौसले और बढ़ेंगे। हमारा संघर्ष और मज़बूत होगा।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 26, 2023
अरविंद केजरीवाल म्हणाले, मनिष सिसोदिया यांच्या अटकेमुळे सर्वसामान्य नागिरकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रत्येकजण हे पाहतोय. लोकांना सर्व काही समजत आहे. लोकं याला उत्तर देणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री केजरीवालांनी दिला आहे.
Aaditya Thackeray यांचा शिंदे गटावर हल्ला… आधीचे ‘ईडी’ सरकार आता झाले ‘बीसी’ सरकार!
तसेच मनिष सिसोदियांच्या अटकेमुळे आमचे मनोबल आणखी वाढणार असून आमचा संघर्ष आणखी मजबूत होणार असल्याचा विश्वासही केजरीवालांना यावेळी व्यक्त केला आहे.
अधिवेशनाआधीच उपमुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा ‘तो’ मुद्दा निकाली, म्हणाले, ‘खराब प्रति….’
दरम्यान, सीबीआयच्या तपासात मनिष सिसोदियांकडून सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप करत त्यांना सीबीआयन काल अटक केलीय. अटक होण्याआधीच सिसोदियांनी एका ट्विटद्वारे मोठं विधान करीत मी पुन्हा एकदा सीबीआयच्या मुख्यालयात जात असल्याचं सांगितलं होतं.
Ajit Pawar यांची निवडणूक आयोगावर टीका… तर राजू पाटील यांना अख्खा ‘मनसे’ पक्ष देणार का?
त्यासोबतच सीबीआयच्या संपूर्ण तपासात सर्वकाही सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मला काही महिने जेलमध्ये रहावे लागले तरी पर्वा नाही, देशासाठी ज्या भगतसिंहांना फाशी देण्यात आली मी त्यांचाच अनुयायी असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
छोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट असल्याचं म्हणत त्यांनी जेलमध्ये जाण्याबाबतचे एक प्रकारे संकेतच दिले होते, असं बोललं जातंय.