अधिवेशनाआधीच उपमुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा ‘तो’ मुद्दा निकाली, म्हणाले, ‘खराब प्रति….’
मुंबई : एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने 512 किलो कांदे विक्रीला नेला तेव्हा त्याला अवघ्या दोन रुपयांचं चेक मिळाल्याची बातमी समोर आलेली. संबंधित शेतकऱ्याचं राजेंद्र चव्हाण (Rajendra Chavan) असं नाव आहे. या शेतकऱ्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणाची विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतली. सोलापुरातील एका 512 किलो कांदा विकल्यानंतर या शेतकऱ्याला 2 रूपयांचा चेक मिळाला. हे दुर्दैव आहे असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी तात्काळ दखल घेत 2 रुपयांचा चेक देणाऱ्या कंपनीवर कारवाई केली आहे.
राज्याचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
512 किलो कांदे विकणाऱ्या कांदा उत्पादकाला अडत व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिला होता. या धनादेशाची सर्वत्र चर्चा झाली. याचा व्हिडीओ तयार करुन शेतकऱ्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पाठवला होता. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अजित पवार यांनी शेतकऱ्याचा व्हिडीओ दाखवून शेतकऱ्यांची बाजू मांडली आणि सरकार जोरदार हल्लाबोल केला होता. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, शेतकरी राजेंद्र चव्हाण यांचं जे प्रकरण आहे, त्यांनी 512 किलो कांदा विक्रीला आणला होता. छोटा कांदा असतो, तो कमी प्रतीचा असतो. त्याला 100 ते 150 भाव मिळतो. तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला 500 ते 1400 रुपये दर मिळतो. या पद्धतीने चव्हाण यांना 512 रुपये आले. पण त्यांना जो चेक मिळाला त्या सिस्टममधून त्यांना फक्त दोनच रुपये मिळाले. त्याच कारण म्हणजे एकूण रकमेतून वाहतुकीचा खर्च वजा करण्यात आला.
Ajit Pawar अन्य राज्ये येऊन गुंतवणूक पळवून नेतात… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरतात
ते म्हणाले, 2014 साली आपण एक शासन निर्णय काढला होता. त्यात असं नमुद केलं की, खराब प्रतिच्या मालातून वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही. मात्र तो खर्च वजा केल्याने राजेंद्र चव्हाण यांना दोन रुपये मिळाले. ही बाब लक्षात येताच संबंधीत सूर्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
फडणवीस म्हणाले, आपल्या बाजुचे तीनही देश अडचणीत आहे. त्याच्याकडे परकीय चलनाचा तुटवडा आहे. त्यामुळे तीनही देशांनी आयात बंद केली आहे. शिवाय कर्नाटक, राजस्थान या राज्यात कांदा पिकविण्यात येत आहे. त्यामुळे निर्यात करण्याची संधी नाही. आता याबाबत काय करता येईल, त्यासाठी बैठका घेण्याचा काम सुरू असल्याचं फडणवीसांनी नमूद केलं.