Download App

अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया…

Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमदच्या हत्येनंतर सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मंगळवारी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. यावेळी त्यांनी हत्याकांडानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पहिली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आता माफियाची कोणालाही भिती नाही.

सीएम योगी म्हणाले, “यूपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या प्रत्येक भांडवलदाराचे संरक्षण केले जाईल. यूपीमध्ये एक काळ असा होता जेव्हा यूपीची ओळख नष्ट झाली होती. यूपीची प्रगती कोणापासून लपलेली नाही. कानपूर कधी कपडा हे केंद्र होते. उद्योग ही यूपीची ओळख पुन्हा परत येत आहे. आता यूपीमध्ये उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे.” सीएम योगी लखनऊमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “2017 पूर्वी यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. आता माफियाची कोणालाही भिती राहिलेली नाही. आता यूपीच्या कोणत्याही जिल्ह्यात दंगल होत नाही. आमच्या सरकारने यूपीला दंगलमुक्त केले. आता यूपीमध्ये कायद्याचे राज्य आहे.” पुढं ते म्हणाले की आता माफिया कोणालाही धमकावू शकत नाहीत. सहा वर्षांत कर्फ्यू लावला नाही. आता यूपीमध्ये कायद्याचे राज्य आहे. पूर्वी यूपीमध्ये रोज दंगली व्हायची.”

मार्केटमध्ये खणखणीत नाण्याची चर्चा होतेचं; अजितदादांवरुन सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

गेल्या १५ एप्रिलला अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हत्याकांडातील आरोपी माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ माजी आमदार अश्रफ यांची शनिवारी रात्री १० वाजता माध्यमांशी संवाद साधताना तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. घटनेच्या वेळी पोलीस अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत होते.

Tags

follow us