China HMPV Virus First Case Found In India : बंगळुरूमधील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्ही (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलंय. भारतात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. चीनमधून हा धोकादायक व्हायरस (Virus) भारतातही पोहोचला आहे. एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये आढळून आलाय. बेंगळुरूमध्ये (Bengaluru) 8 महिन्यांच्या मुलामध्ये HMPV विषाणूची पुष्टी झाली आहे. तापामुळे बाळाला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्त तपासणीनंतर एचएमपीव्ही विषाणू (HMPV Virus) आढळून आला. तेथील प्रयोगशाळेने याची पुष्टी केलीय. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, अवादा कंपनीकडे मागितली 3 कोटींची खंडणी; सुरेश धस यांचे गंभीर आरोप
चीनमध्ये HMPV विषाणू (china virus) खूप वेगाने पसरत आहे. त्याचा उद्रेक पाहता चीनमधील अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. चीनच्या अनेक भागात परिस्थिती बिकट झाली. या विषाणूमुळे हजारो लोक असुरक्षित आहेत. वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. बाल वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. भारत चीनच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
धस अन् जरांगे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक, पावशेर दारू पिऊन..; गुणरत्न सदावर्तेंचे टीकास्त्र
भारत सरकारही या व्हायरसबाबत सतर्क झाले आहे. सरकारने HMPV बाबत एक सल्लाही जारी केलाय. सरकारने श्वासोच्छवासाची लक्षणे आणि इन्फ्लूएंझा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने सांगितले की, HMPV प्रकरणांची चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या वाढवली जाईल. भारत सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलला देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय भारताने जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) नवीनतम अपडेट्स शेअर करण्यास सांगितले आहे.
HMPV व्हायरस म्हणजे काय?
गेल्या अनेक दशकांपासून एचएमपीव्ही विषाणू अस्तित्वात असल्याचे सांगितलं जातंय. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये याची प्रथम ओळख झाली. श्वसन रोग असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये विषाणूची पुष्टी झाली. एचएमपीव्ही हा पॅरामिक्सोव्हिरिडे कुटुंबातील विषाणू आहे. हा विषाणू सर्व ऋतूंमध्ये हवेत असतो. संक्रमित लोकांच्या खोकल्यामुळे आणि शिंकण्याने याचा प्रसार होतो. हिवाळ्यात त्याचा अधिक प्रसार होण्याचा धोका असतो. एचएमपीव्ही विषाणू 1958 पासून मोठ्या प्रमाणावर पसरला होता, असं देखील तज्ञांनी सांगितलंय.