धस अन् जरांगे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक, पावशेर दारू पिऊन..; गुणरत्न सदावर्तेंचे टीकास्त्र
Gunaratna Sadavarte : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल (शनिवारी) सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा परभणीत काढण्यात आला होता. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बोलतांना धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर घरात घुसून मारु, असा इशारा दिला. त्यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी भाष्य केलं.
महापालिका, झेडपीसाठी शिंदेंनी रसद जमविली ! ‘या’ सात ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली
पावशेर दारू पिऊन जर धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस कराल तर गय करणार नाही, असा इशारा सदावर्तेंनी दिला.
गुणरत्न सदावर्ते यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे तुझी उंची किती आहे, तुझं शिक्षण काय? तू बोलतो काय? पावशेर दारू पिऊन जर कुणी मंत्री धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस करत असेल तर तो कितीही मोठा असो, त्याची गय केली जाणार नाही, त्याला संविधानिक उत्तर दिलं जाईल, तुमच्याचा बापाचे रस्ते आहेत का बे? शेताला शेत असलं तरी वाट द्यावी लागलेत, असं सदावर्ते म्हणाले.
धस अन् जरांगे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे…
पुढं ते म्हणाले, सुरेश धस, जरांगे पाटील हे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. मृत व्यक्तीच्या नावावर राजकारण करून मंत्रीपद न मिळाल्याने ते आरोप करत आहेत. मंत्रिपदाची लालसेपोटी ते मोर्चांमध्ये सहभागी ते होत आहे. जातीय तेढ निर्माण करत आहेत. पण, धस आणि मनोज जरांगे पाटील यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल. संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाची देणं म्हणून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे मंत्री आहेत. वाल्मिकी कराडला कोर्टाने दोषी ठरवलं का, अटक करणे हा कायदेशीर भाग आहे.अटक केली म्हणून कुणी दोषी ठरत नाही, असंही सदावर्ते म्हणाले.
सुरेश धस यांनी यांनी इतरांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलताना स्वत:चे आयुष्यही लक्षात ठेवले पाहिजे. उंगलीनिर्देश आम्हालाही करता येतात. पावशेरची गुंडगिरी चालू देणार नाही, असं ते म्हणाले.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन येत्या गुरुवारी (९ जानेवारी) एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येतंय. त्यावरही सदावर्तेंनी भाष्य केलं. ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा, बंद करणाऱ्यांना बडतर्फ करण्यात येईल. लोकशाहीने दिलेली ही पदे आहेत. ही पदे कोणाच्या बापाच्या घरची नाहीत, असं सदावर्ते म्हणाले.